Thursday 24 March, 2011

अंक ११ वा, २४ मार्च २०११

संपादकीय *
नुकसान भरपाईतही भ्रष्टाचार!
गेली चार वर्षे कोकणातील आंबा-काजू बागायतीत अकाली पाऊस आणि विपरीत हवामानामुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागत आहे. खूपच मोठे नुकसान झाल्यामुळे सरकारने कधी नव्हे ती कोकणातील शेतकरी बागायतदारांना अल्प प्रमाणात का होईना नुकसान भरपाई रोखीने दिली. परंतू नंतरच्या वर्षी मात्र अनेक जाचक अटी घालून नुकसान भरपाईपोटी शेतक-यांना खते, किटकनाशके पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यास शेतक-यांनी विरोध करुन रोख स्वरुपात अथवा धनादेशाद्वारे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. ही गोष्ट २००८च्या शेती - बागायती हंगामाची होती. त्याकरिता केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला २८ कोटी रुपये देण्यात आले होते. परंतू शेतक-यांची रोख भरपाईची मागणी असूनही राज्य सरकारने खते-कीटकनाशके तालुका खरेदी - विक्री संघामार्फत देण्यास सुरुवात केली. ती निकृष्ट असल्याची, परिणामशून्य आल्याची तक्रार अनेक शेतक-यांनी केली आहे.
एकीककडे रासायनिकचे शेती - बागायतीवर दुष्परिणाम, होतात म्हणून सेंद्रीय खतांचा वापर करावा असे कृषी अधिकारी शेती शास्त्रज्ञ सांगत असतात. असे असतांना सरकारने रासायनिक उत्पादने करणा-या कंपन्या त्यांचे ‘एजंट‘ आणि संबंधीत निर्णय घेणारे अधिकारी, मंत्री यांनी धन करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे.
एरवीही शेतक-यांना सरकारच्या कृषी विभागामार्फत शेती - बागायतीसाठी पीक संरक्षण म्हणून कीटकनाशके ५० टक्के अनुदानावर पुरविली जातात तीही रासायनिक असतात. हाही भ्रष्ट कारभाराचा नमुनाच आहे. तेच धोरण शेतक-यांसाठी केंद्र सरकारने दिलेली मदत आपल्या शेतक-यांना रोखीने न देता रासायनिक खते कीटकनाशके माथी मारुन विद्यमान सरकारी यंत्रणा राबवीत आहे. सरकार शेतक-यांना जी मोफत खते - कीटकनाशके देत आहे. ती उत्पादक कंपन्या किवा त्यांचे वितरक यांच्याकडून कोट्यावधी रुपये मोजून खरेदी करीत असते. ती खते-कीटकनाशकेही बनावट आणि परिणामशून्य असल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. ती उत्पादने वापरल्याने शेतजमिनी कालांतराने निकृष्ट बनतात. झाडे नैसर्गिक गुणधर्म गमावतात. परिणामी शेती - बागायतीचे उत्पादन घटते शेतकरी कर्जबाजारी होतो. विदर्भात हेच घडले आणि हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. कोकणातही गेली काही वर्षे विपरीत हवामानामुळे आंबा - काजू पिकामध्ये घट होत आहे. त्यावर अवलंबून असणारे शेकडो बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. पण आपल्याकडे बँकेचे कर्ज घेणे किवा कोणाचे देणे थकणे ही बाब अभिमानाची नसल्याने कोणी उघड काही बोलत नाहीत. पण हा कर्जबाजारीपणा निर्माण होण्यास निसर्गाबरोबरच सरकारी धोरण आणि भ्रष्टाचारही तितकाच कारणीभूत आहे.
इथेही शिक्षणाचा संबंध येतोच. शेतकरी - बागायतदार पारंपारीक अनुभवांतून शेती शास्त्र शिकत आलेला आहे. आता कृषिशाळा, कृषि महाविद्यालयांतून शेती-बागायतीचे शास्त्रीय, वैज्ञानिक शिक्षण दिले जाते. पण काही अपवाद वगळता हे शिकलेले स्वतःच्या शेती-बागायतीचे व्यवस्थापनही करीत नाहीत तर, या क्षेत्रातील सरकारी, निमसरकारी नोक-यांच्याच मागे लागातात.
शेती उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय संशोधन झाले. नव्या तंत्राने उत्पादनही वाढते. परंतू शेतकरी परावलंबी होत गेला. कॉलेजात शिकलेल्या आपल्या मुलांनी शेतीत न राबता नोकरीच धरावी अशी मानसिकता तयार झाली. परिणामी नारळ - सुपारी - आंबा बागायतीत मेहनत मशागत करण्याला, फळे काढण्याला कोकणात स्थानिक माणसे मिळत नाहीत. वाढीव रोजगार देण्याची तयारी असूनही श्रम करणे कमी झाल्याने शेती - बागायतीत यांत्रीक अवजारांचा वापर वाढला. शेती अधिक महाग झाली. यात दोष शिक्षणाचा नाही तर श्रम संस्कृती निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या कुटुंबाचा तसेच स्थानिक व राजकीयही नेतृत्वाचा आहे.
या सर्वांवर मात करीत पारंपारिक शिक्षणातील दोष करुन कोकणात दापोलीला रेणू आणि राजा दांडेकर दांपत्याने लोकमान्य टिळक विद्यालयात श्रमांना प्रतिष्ठा देणा-या जीवनशिक्षणाचा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे. अशा प्रकारचे प्रयोग सर्वत्र व्हावेत या उद्देशाने त्यांच्या जीवनशिक्षण उपक्रमाची माहिती या अंकात दिली आहे. ज्यांना सामाजिक कार्याचे उद्देश सांगत राजकारण करावयाचे आहे त्यांना असे कार्य हे एक आव्हान आहे.
अधोरेखीत *
भ्रष्टाचाराने सडलेली शिक्षण यंत्रणाच दोषी
लॉर्ड मेकॉले या इंग्रज अधिका-याने भारतात आणलेली शिक्षण पद्धती आता किती महागात पडत आहे हे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी अनुभवाला येऊ लागले आहे. इंग्रजांनी भारतात शिक्षणाचा प्रसार केला तो खंडप्राय असलेल्या या देशावर राज्य करण्यासाठी. स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा तयार करण्याकरिता. त्यातून निर्माण झाली ती नोकरशाही. अर्थात या शिक्षणाचा फायदा भारतीयांनाही झालाच. ब्रिटिश सत्तेविरोधात लढणारे बरेच नेते उच्चविद्याविभुषित झाले. अनेकांनी इंग्लंडमध्ये जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला त्यांचे नेतृत्व लाभले. हे सगळे खरे असले तरी मुळात सरकार धार्जिणी नोकरशाही संपूर्ण देशभर निर्माण करण्याचे ब्रिटिश सत्ताधा-यांचे धोरण होते ते यशस्वी झाले.
ब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतरच्या पहिल्या कालखंडात जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नेते समाजाशी बांधीलकी असणारे होते आणि नोकरशाहीसुद्धा ब्रिटिशांच्या शिस्तीत वाढलेली होती. ती पिढी अस्तंगत झाल्यानंतर स्वार्थी नेतृत्व आणि त्यांना साथ देणारी सरकारी यंत्रणा हळूहळू भ्रष्ट मार्गाकडे वळू लागली. आज तर सरकारी, निमसरकारी, सहकारी इतकेच नव्हे तर सैन्यदले, मोठे खाजगी उद्योगधंदे असे समाजाच्या सर्व थरातील सर्वच क्षेत्र भ्रष्टाचाराने ग्रासलेले आहे. वेतनवाढ आयोगांनी वारंवार मोठी वेतनवाढ देऊनही भ्रष्ट मार्गाने आणखी पैसे मिळविण्याचे प्रकार थांबले तर नाहीतच पण अधिक मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. अजूनही कायद्याचा धाक असल्याने भ्रष्टाचार उघडपणे होताना दिसत नाही. किवा तो उघडकीस आला तरी पुरावा ठरणार नाही याची खबरदारी घेतली जाते इतकेच.
शिक्षण क्षेत्र या भ्रष्टाचारापासून मुक्त असावे अशी एक भाबडी अपेक्षा कोणाचीही असणार. पण तिथेही नोकरशाहीने बाजी मारली आहे. लोकप्रतिनिधी हे त्यांचे ‘एजंट‘ झाले आहेत. याची उदाहरणे पदोपदी दिसतात. शिक्षण संस्था स्थापन करुन शाळा महाविद्यालये चालविणे हा एक धंदा बनल्यापासून काही अपवाद वगळता शिक्षणसंस्थाही या भ्रष्ट आचारापासून वेगळ्या राहिलेल्या नाहीत. यातूनच शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे.
‘किरात‘ने मार्च महिन्याच्या अंकांतून हाच विषय प्राधान्याने मांडला आहे. कोकणापुरता विचार केला तर ध्येयवादी दृष्टिकोन ठेवून अनेक शिक्षण संस्था व त्यांचे चालक प्रामाणिकपणे व निष्ठेने या क्षेत्रात काम करीत आहेत. मुंबई सारख्या महानगरातही मूळ कोकणातील अनेकांनी शिक्षण संस्था आजही चांगल्या प्रकारे चालविलेल्या आहेत. त्यामध्ये मुंबईतील इंडियन एज्युकेशन सोसायटी, बालमोहन विद्यामंदिर, बॅ. नाथ पै शिक्षणसंस्था, उपनगर शिक्षण मंडळ, विद्याविकास शिक्षणसंस्था, तसेच कोकणातील युनायटेड इंग्लिश स्कूल-चिपळूण, गोगटे-जोगळेकर कॉलेज-रत्नागिरी, एस.एम.हायस्कूल-कणकवली, कुडाळ हायस्कूल, केळकर महाविद्यालय-देवगड, मिलाग्रीस हायस्कूल-सावंतवाडी, खांडेकर विद्याप्रतिष्ठान शिरोडा याबरोबरच ग्रामीण भागातील अनेक शाळा-संस्थांचा नामोल्लेख करता येईल.
कोकणात विशेषतः रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांचा मुंबईशी संफ असल्याने येथे शंभरी ओलांडलेल्या शिक्षणसंस्था ब-याच आहेत. त्यांच्या अनेक शाळा आहेत. पण काही अपवाद वगळता बहुतेक शिक्षणसंस्थांना शिक्षणाधिकारी कार्यालयाने वेठीला धरुन त्यांची वाट लावली आहे. जिल्ह्यातील अनेक संस्थांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कारभाराबद्दल गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्यानंतर पी. बी. पाटील या अधिका-याची चौकशी अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली. त्यांनी केलेल्या चौकशीनुसार अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. (१७ मार्चच्या अंकात त्यासंबंधीची माहिती दिलेली आहे.)
प्राथमिक शिक्षण विभागाची तर वेगळीच त-हा आहे. शिक्षकांच्या नव्या नेमणुका आणि बदल्या हे भ्रष्टाचाराचे एक कुरण बनले आहे. गेली काही वर्षे शिक्षण सेवकांच्या नेमणुका प्राधान्याने परजिल्ह्यातील उमेदवारांच्या होतात. त्यासाठी शिक्षण खात्यातले अधिकारी आणि जिल्हा परिषदांचे लोकप्रतिनिधीही ‘बांधले‘ जातात. एक दोन वर्षातच हे शिक्षक (?) आपल्या मूळ गावात बदली करवून घेतात. स्थानिक उमेदवारांनी या विरोधात आंदोलने करुनही काही निष्पन्न झालेले नाही. महाविद्यालयीन शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांचा कारभार हा तर अनेक प्रबंधांचा विषय होईल!
सरकारने शिक्षणाकरिता एवढ्या सोयी, सुविधा, पैसा आणि शिक्षकांना चांगले वेतन देऊनसुद्धा शिक्षणाचा एकूण दर्जा खालावलेला आहे. यामध्ये शिक्षणासंबंधी तयार केलेले कायदे, नियम, कार्यपद्धती यांचा दोष नाही तर त्याची अंमलबजावणी करणारी सडलेली प्रशासकीय यंत्रणाच याला जबाबदार आहे आणि ती याच शिक्षणपद्धतीतून तयार झालेली आहे!
श्रीधर मराठे
विशेष *
उच्च शिक्षण -अपेक्षा आणि वास्तव

आज या देशातील उच्च शिक्षण राजकारणी लोकांची सरंजामशाही, प्रशासनातील उच्च पदस्थांची अधिकारशाही आणि शिक्षण सम्राटांची सावकारी या तिन्ही शक्तींच्या संघटीत आघाडीने ग्रासलेले आहे. उच्च शिक्षण घेणा-या घेऊ इच्छिणा-या तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी उच्च शिक्षणात येऊ पहाणा-या आमूलाग्र सुधारणांच्या बाजूने आपली ताकद उभी करणे ही आजची खरी गरज आहे. कपिल सिब्बल यांच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा पराभव होण्याची शक्यता आहे आणि तसे झाले तर जगातील ५००च काय पण पहिल्या १००० विद्यापिठांमध्येही भारतातील २-४ विद्यापिठेही दिसणार नाहीत. आपल्याला हे परवडणारे आहे काय?
काय अपेक्षित आहे?
एकविसाव्या शतकातील दुस-या शतकात उच्च शिक्षणाकडून आपल्या नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत हे पहाणे महत्वाचे आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या संदर्भात सुस्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या मते आज सर्व मानव जातीला भेडसावणारे प्रश्न म्हणजे पर्यावरण, उर्जा, इंधन, पाणी, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि आतंकवाद या संदर्भातील आहेत. हे प्रश्न कोणा एका देशाचे नाहीत. ते सर्व जागचे प्रश्न ाहेत. त्यांची उत्तरे कोणा एका देशाकडे नाहीत. ती जगातील सर्व देशांच्या सहकार्यानेच शोधणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक असणा-या संशोधन व विकासासाठी जगातील विद्यापिठांनी आणि शिक्षण संस्थांनी एकत्रित काम करणे क्रमप्राप्त आहे. या प्रक्रियेची सुरुवात यापूर्वीच झाली आहे. बंगलोरच्या आयबीएम या संस्थेत कोरियाचा प्रकल्प अधिकारी, चीनचा सॉफ्टवेअर डेव्हलपर, भारतीय संगणक इंजिनिअर आणि अमेरिकन हार्डवेअर इंजिनिअर हे सर्व एकत्रितपणे आणि निष्ठेने ऑस्ट्रोलियातील एका बँकींग प्रश्नावर काम करीत होत. म्हणजेच आजचे उच्च शिक्षण देशांच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळेच डॉ. कलाम यांनी जागतिक ज्ञान व्यासपिठाची संकल्पना मांडली आहे. उद्याच्या ज्ञानाधिष्ठित जागतिक समाजाचे जबाबदार नागरिक घडविणे ही आपल्या विद्यापिठांची जबाबदारी आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात जगात कोठेही जाऊन भरीव कामगिरी करणारे तरुण विद्यापिठांनी घडविले पाहिजेत. त्यासाठी ज्त्द्धद्यद्वठ्ठथ् क्थ्ठ्ठद्मद्मद्धदृदृथ्र्द्म आणि ज्त्ड्डड्ढदृ क्दृदढड्ढद्धड्ढदडड्ढद्म अशा साधनांचा वापर जगातील सर्व विद्यापिठांमध्ये सुरु होऊन ती एकमेकांना कार्यक्षमपणे जोडली जातील आणि संशोधन व त्याचा मानवी जीवनातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्वरीत उपयोग करणे ही विद्यापिठांची जबाबदारी राहील. जागतिक स्तरावर सतत टिकून राहणारी स्पर्धात्मक गुणवत्ता हा उच्च शिक्षणाचा पहिला निकष आहे. गॅटस् करारामुळे तर आता परदेशी विद्यापिठांचा भारतातील प्रवेश आपण फार काळ टाळू शकणार नाही. त्या संदर्भातील विधेयक लवकरच लोकसभेत मांडले जाणार आहे.
डॉ. कलाम यांचे प्रतिपादन कोणास खूप आदर्शवादी वाटणे शक्य आहे. पण आपल्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या अध्यक्षांनीही हेच म्हटले आहे. सॅम पित्रोदांच्या मतानुसार आपल्याला शिक्षण क्षेत्रात खूप धाडसी निर्णय घेऊन त्वरित अमूलाग्र सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. दरवर्षी वीस दशलक्ष नोक-या आपल्याला आपल्या तरुणांसाठी निर्माण कराव्या लागतील. आपण हे करु शकतो. कारण आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आपल्या कामगिरीच्या जोरावर रु. २,८८,००० कोटींची कमाई करुन दाखविली आहे. पण या माहिती तंत्रज्ञानाचा आपण शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात उपयोग केलेला नाही. तो करावा लागेल आणि त्यासाटी अमेरिकेची मदतही घ्यावी लागेल. हे काम आपल्या विद्यापिठांनीच करावयाचे आहे. २०२० साली आपल्या विद्यापिठांमध्ये ६६ दशलक्ष विद्यार्थी असतील, तरीही १४० दशलक्ष विद्यार्थी उच्चशिक्षणाचे बाहेर जातील. यावर जगात कोठेही, कोणाही आपल्याला उपाय सुचवू शकणार नाही. हा प्रश्न आपल्या आपणच सोडविली पाहिजे. तसेच उच्च शिक्षणाची गुणवत्ताही जागतिक दर्जाचीच असणे आवश्यक आहे.
आपण कोठे आहोत?
डॉ. विकास इनामदारांच्या मतानुसार २००९च्या क्रमवारीत जगातील पहिल्या ५०० विद्यापिठांच्या यादीत अमेरिकेतील १५२, ब्रिटनमधील ४०, जर्मनीची ४०, जपानची ३१, फ्रान्सची २३, कॅनडाची २२, इटलीची २१, ऑस्ट्रेलियाची १७, हॉलंडची १२, स्वीडनची ११, स्पेनची ११ विद्यापीठे आहेत. या यादीत चीनची ३० तर भारताची अवघची दोन विद्यापीठे आहेत. १) क्ष्दड्डत्ठ्ठद क्ष्दद्मद्यत्द्यद्वद्यड्ढ दृढ च्डत्ड्ढदडड्ढ, एठ्ठदढठ्ठथ्दृद्धड्ढ आणि २) क्ष्च्र्क्ष्, खरगपूर.
डॉ. इनामदार म्हणतात, ‘आपल्याकडे शिक्षणतज्ञ आहेत, शिक्षण महर्षी आहेत, शिक्षण सम्राटही आहेत. तरीही भारत शिक्षण क्षेत्रात मागे पडला आहे. विशेषतः डॉ. मुरली मनोहर जोशी आणि अर्जुन सिग या दोन मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या कारकिर्दीत अत्यंत चुकीची आणि अदूरदर्शीपणाची धोरणे राबविली गेल्यामुळे शिक्षण क्षेत्राची अपरिमित हानी झालेली आहे.‘
२५ मे २००९ रोजी सिब्बल यांनी आपल्या मंत्रालयाचा १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे संदर्भात त्यंनी काही ठोस निर्णय घेतले. (प्राथमिक शिक्षणाचा घटनात्मक अधिकार, १०वीची बोर्डाची परीक्षा ऐच्छिक करणे इ.) उच्च शिक्षणाचे संदर्भात त्यांनी तीन अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. १) परराष्ट्रातील उच्च शैक्षणिक संस्थांना, विद्यापीठांना भारतात प्रवेश करु देण्यासंदर्भातील एक व्यापक विधेयक लोकसभेत मांडणे, २) राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या शिफारसी आणि यशपाल समितीच्या सूचना लक्षात घेऊन ‘राष्ट्रीय उच्चशिक्षण व संशोधन आयोगा‘ची स्थापना करणे आणि ३) दूरशिक्षण मंडळ स्थापन करणे, डिसेंबर ०९ पर्यंत ही विधेयके संसदेत यावीत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचा मसुदा त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे पाठविला. या विधेयकामध्ये छक्रक्, ऋृक्ष्क्च्र्क, ग़्क्च्र्क, क्कक्, एक्क्ष्, ग्क्क्ष् अशा प्रकारच्या अनेक स्वायत्त स्वरुपात काम करणा-या केंद्रीय अधिकार मंडळाचे विलिनीकरण करुन एकच ‘ग़्ठ्ठद्यत्दृदठ्ठथ् क्दृद्वदडत्थ् ढदृद्ध क्तत्ढण्ड्ढद्ध कड्डद्वडठ्ठद्यत्दृद ठ्ठदड्ड ङड्ढद्मड्ढठ्ठद्धडण्‘ म्हणजेच ‘राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोगा‘ची स्थापना करणेचा त्यांचा ठाम निर्धार आहे. त्याचबरोबर देशातील अल्पकाळात मोठ्या संख्येने निर्माण झालेली खासगी अभिमत विद्यापीठे वादाच्या व टीकेच्या भोव-यात सापडल्यामुळे त्यांची चौकशी करुन अशा भ्रष्टाचारात गुंतलेल्या अभिमत विद्यापिठांना परवानगी न देण्याचाही त्यांचा निर्धार आहे. साहजिकच या नव्या सुधारणा हितसंबंधी राजकारणी मंडळी आणि प्रशासनातील बड्या अधिका-यांना न आवडणा-या अशाच होत्या. त्याचा परिणाम म्हणून कपिल सिब्बलांच्या उच्च शिक्षणविषयक विधेयकांवर व्यापक चर्चा घडवून तज्ज्ञांची मते आजमावून घ्यावीत अशी सूचना पंतप्रधानांच्या कार्यालयाने केली आहे.
या देशातील कायदेविषयक शिक्षण हे अनेक अडचणींच्या जंजाळात गुरफटले आहे हे सर्वज्ञात आहे. त्यात अमूलाग्र सुधारणा करणेसाठी सिब्बल यांनी १२ कायदे तज्ज्ञांची एक समिती नेमली आहे आणि कायदेविषयक शिक्षणात व्यापक सुधारणा होणेसाठी योग्य त्या शिफारसी या समितीने कराव्यात असे त्या समितीला सांगणेत आले आहे.
राजकीय धोरणानुसार केंद्रीय मंत्र्यांमध्येच मतभेद असणे, राजकारण्यांचे हितसंबंध आमि नोकरशहांचे लागेबांधे शैक्षणिक हिताच्या आड येणे आणि परिणामी, प्रवेश, शुल्क आणि राखीव जागा यांचे वाद सर्वोच्च न्यायालयात वर्षानुवर्षे चालत राहून विद्यार्थी - पालकांचे नुकसान होणे अशा परिस्थितीचे आपण साक्षीदार झालो आहोत.
१९९४ साली महाराष्ट्र राज्य विद्यापिठ कायदा घाईघाईने संमत करणेत आला. त्यावर विधीमंडळात फारशी चर्चाच झाली नाही. त्यानुसार ‘राज्य उच्च शिक्षण परिषद‘ (च्द्यठ्ठद्यड्ढ क्दृद्वदडत्थ् दृढ क्तत्ढण्ड्ढद्ध कड्डद्वडठ्ठद्यत्दृद) स्थापन करणे राज्य सरकारवर बंधनकारक होते. ही परिषद उच्चशिक्षण विषयक ‘च्र्ण्त्दत्त् च्र्ठ्ठदत्त्‘ म्हणून काम करले आणि उच्च शिक्षणविषयक धोरण ठरवून राज्यसरकारला योग्य त्या शिफारशी करेल.
काय करणे गरजेचे आहे?
आज तरी यशपाल समिती, राष्ट्रीय ज्ञान आयोग, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल आणि खुद्द पंतप्रधान मनमोहन सिग यांची मानसिकता उच्च शिक्षणात नव्याने होऊ पहाणा-या सुधारणा अंमलात याव्यात अशीच आहे. पण त्याचवेळी उच्च शिक्षण व्यवस्थेतील अंतर्गत घटक आणि बाह्य हितसंबंधी घटक या सुधारणा प्रत्यक्षात अंमलात येऊ नयेत म्हणून कार्यरत आहे असं दिसते ाहे. म्हणून उच्च शिक्षण घेणा-या आणि घेऊ इच्छिणा-या तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी या सुधारणांच्या बाजूने आपली ताकद उभी करणे ही आजची खरी गरज आहे.
-प्रा. डॉ. एच. व्ही. देशपांडे, कोल्हापूर

जीवनशिक्षणातून ग्रामविकास
स्वयंप्रेरणा-

कोकण हा बुद्धिवंतांचा प्रदेश. इथे निर्माण झालेली बुद्धिमत्ता साहित्यिक, सामाजिक, राजकीय अशा देशकार्यात परावर्तित झाली. पण तिने मूळ कोकणाशी कोणते इमान राखले? इथल्या परिसराच्या विकासाशी तिचे कोणते नाते राहिले? इथे निर्माण होणा-या आंब्या-काजूप्रमाणेच बुद्धिमत्तेची सातत्याने निर्यात होत राहिली. निर्यात मग ती वस्तूंची असो किवा मानवी साधनसामुग्रीची असो, ती आपल्या मूळ उत्पादक भूमीला वंचित ठेवते, हा अनुभव व्यवहारात दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे.
शिक्षणातून माणूस आणि माणसांतून गाव अशा त-हेने ताठ उभे राहिले पाहिजे की, गाव सोडून जाण्याची इच्छा नाहीशी व्हावी. गावातच संपन्न विकासाचा आणि त्याच्या निर्मितीचा अनुभव जर माणसांना मिळत राहिला तर स्थलांतराची गरज राहणार नाही. ग्रामविकासाची ही भूमिका घेऊन राजा आणि रेडू दांडेकर पती-पत्नी कोकणात स्वतः जाऊन आता रुजले आहेत.
परिसरातल्या एकोणीस गावांना कवेत घेऊ पाहणारी लोकमान्य टिळक विद्यामंदिर ही खाजगी शाळा १९८४ साली सुरु झाली लोकमान्य टिळक यांच्या मूळ गावात, चिखल गावात. ही शाळा सुरु करताना औपचारिकपणे चाललेल्या आणि शासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शाळांचा फोलपणा जसा जाणवत होता तसाच आपण काय बदल करायचाय याचाही वैचारिक आराखडा प्रवर्तकांच्या मनामध्ये स्पष्ट होता. पुस्तकामधल्या ओळी वाचतांना मुलांना असे काही देऊ या की ती आपल्या गावात, मातीत रुजतील, राहतील. शिक्षणाचा संबंध फक्त नोकरीपुरताच लावता कामा नये. त्याचा संबंध आहे माणसाला माणूस म्हणून घडवण्याशी. माणसांच्या जाणिवांशी. शिक्षण या चाकोरीतून माणूस शिक्षित होतोय. सुसंस्कृत किती होतोय याचा विचार करणे गरजेचे. झापडे बांधलेल्या गुरासारखे मूल कागदावरच्या पदवीचा गुलाम होईल. ‘डोनेशन‘चा न उकलणारा अर्थ शोधेल, मातीपासून दूर जाईल. हे घडू नये याचाच विचार प्रत्येक मुलाच्या बाबतीत करायला हवा. अशा प्रकारे विचारांची स्पष्टता होती. त्यामुळेच ती योजनाबद्धरीतीने व्यवहारात उतरु शकली.
शिक्षणाचा प्रश्न-
‘शिक्षण हा आनंददायी अनुभव असायला हवा. काहीतरी नवे शिकल्यानंतर त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्याची आस मनुष्याला लागली पाहिजे. यानेच शिकल्याचे समाधान प्राप्त होते.‘ ही पाबळच्या डॉ. कलबाग यांनी दिलेली दिशा हाती आली. दापोली ते दाभोळ या तीस किलोमीटर्सच्या परिसरातील एकोणीस गावांमध्ये शाळा होत्या, त्या फक्त जिल्हा परिषदेच्या आणि पहिली ते सातवीपर्यंतच्या. पुढील शिक्षणासाठी शाळाच नाही. जी मुले हुशार होती, ज्यांच्या घरचे लोक सधन होते, त्यांचे पाय मुंबईची वाट धरत आणि मग ते परत माघारी वळत नसत. उरलेला वर्ग येथेच, नशिबावर रुसलेला. येथेच कुढायचे, नाहीतर अल्पशिक्षणाच्या आधारे मुंबईच्या कारखान्यांमध्ये अपु-या वेतनावर राबायचे! घरातील म्हातारी म्हाणसे कोकणात ठेवून स्वतःच्या चरितार्थासाठी स्थलांतर केलेली ही मुले मुंबईच्या महागाईच्या राक्षसाला तोंड देऊ शकत नाहीत व घरी कोकणात पुरेसे पैसे पाठवू शकत नाहीत. दोन्हीकडे दारिद्र्याची नि अडचणींची केवळ काटेरी झुडपे. मार्ग सुकर नाही. लोकांची ही उलघाल थांबावी व शहरात-परदेशात जाणारी कोकणातील अलौकिक प्रतिभा, बुद्धिमत्ता कोकणच्या विकासासाठी उपयोगी पडावी यासाठी चिखलगावात माध्यमिक शाळा सुरु केली.
गावागावत घरोघरी जाऊन लोकांना शाळेचे, पुढील शिक्षणाचे महत्व सांगायला, समजावायला हे जोडपे हिडत होते. जीवनाशी जुडणा-या पुढील शिक्षणाचे महत्व पटवून देत होते. लोकांचे म्हणणे होते की, जिल्हा परिषदेच्या शाळा असताना खाजगी शाळा हवी कशाला? शाळा सुरु करण्यामागे दांडेकर दांपत्याचा उद्देश, सरकारी शाळांवर गदा आणणे हा नव्हताच. ‘पुढील शिक्षण मुलांना देण्याची सोय करणे, व्यवसाय शिक्षण देणे, येथेच जगण्याची प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण करणे‘ हा होता. आपल्याला जे नवीन सापडले, जे आपल्या येथे यशस्वी होईल ते सरकारी शाळांमधूनही रुजवण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु त्याला लोकांची हवी तशी साथ नव्हती. फक्त बारा मुलांनी शाळेत प्रवेश घेतला. त्यात मुलगी तर केवळ एक आणि शाळेला जागा गोठ्याची. तेथेच राजा दांडेकरांचा दवाखाना व रेणूताईंची शाळा. पण बाराची बाराशे होतील असा आत्मविश्वास होता. त्या आत्मविश्वासावर आठवी, नववी व दहावी वर्गांसाठी पाच शिक्षकांच्या साहाय्याने छोटी शाळा सुरु झाली. त्यासाठी स्थानिक मंडळींच्या सहकार्याने ‘लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास‘ ह्या संस्थेची स्थापना १९८२ साली केली. केवळ लोकमान्य टिळकांचे गाव आणि नाव संस्थेसाठी निवडलेले नाही तर संपूर्ण कार्याच्या मागे लोकमान्यांचा शिक्षणविचार अधिष्ठान म्हणून स्वीकारलेला आहे.
समाजाचा सरकारवर, सरकारी शाळांवर, दहावी-बारावी-पदवी अशा परीक्षांवर विश्वास होता. दहावीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता वाटत होती, त्याने पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकेल, असा लोकांचा विश्वास होता. याचा विचार करुन पठडीतील अभ्यासक्रमाची कास धरली गेली. नव्या अभ्यासक्रमाविषयी किवा अध्यापनाच्या पद्धतीविषयी नव्हे, तर जुन्या अभ्यासक्रमात नवे काय घडवता येईल? जीवन जगण्यासाठी वैचारिक व मानसिक बळ कसे देता येईल याविषयी विचार झाला. म्हणूनच जगाला अभिमानाने सामोरे जाण्यासाठी प्रमाणपत्रांची जोड असलेले ‘औपचारिक शिक्षण‘ व जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असे ‘पूरक शिक्षण‘ यांची सांगड दांडेकर दाम्पत्याने आपल्या शाळेत घातली.
परिणाम असा झाला की भोवतालचा परिसर, रोजचे जगणे यांच्यामध्ये शाळेच्या भिती अडथळा म्हणून उभ्या राहिल्या नाहीत. तर उलट ‘रोजच्या जगण्या‘ने वर्गात प्रवेश केला. मुलांना काय काय येतेय याचा शोध घेतला गेला. गाईगुरे चारणे, कोंबड्या राखणे, शेतीची जुजबी माहिती व शेतीतील कामे हे सर्वसाधारणपणे मुलांचे जगणे होते. पण त्यातून अर्थोत्पादनाची भूमिका मुलांना समजत नव्हती. ‘मुलांना झेपतील अशी कामे द्यावीत‘ एवढाच उद्देश पालकांचा होता. त्यांच्या या रोजच्या कामाला ‘पूरक अभ्यास‘ म्हणून मानले गेले. त्यांच्या सर्वसाधारण माहितीला शास्त्रीय ज्ञानात परावर्तित केले गेले. यासाठी राजाराम दांडेकर हे स्वतः त्या चाळीस किलोमीटर्सच्या परिसरात विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञांचा शोध घेत फिरु लागले. कोणी प्रयोगशील शेतकरी, कोणी फळांचा-फुलांचा-कलमांचा जाणकार, कोंबडी पालनातील कोणी माहितगार, तर बंदिस्त जागेतील शेळीपालन करणारा, बंद खोक्यांतून मधाचे पोळे वाढवणारा अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी सापडली. मुलांना आपापल्या विषयातील ज्ञान देण्यासाठी ही मंडळी आनंदाने तयार झाली. पाचवी ते सातवीच्या वर्गातील मुलांचे छोटे छोटे गट पाडले व सर्वांनाच नियोजन करुन सर्व कामे शिकवण्यास सुरुवात झाली. गाईगुरे, शेळ्यामेंढ्या चरायला नेणे या कामातच त्यांच्या योग्य पालनाची माहिती देण्यास सुरुवात झाली. दुग्धव्यवसायाची माहिती दिली देली. ‘सहकार‘ तत्वावर दूध एकत्र करुन विकणे सुरु झाले. लोकरीसाठी मेंढीपालनाची आवश्यकता व लोकर काढण्याची माहिती मुलांना दिली गेली. घरोघरी कोंबड्या पाळून पुन्हा सहकारावर हा व्यवसाय कसा वाढवता येईल याचेही ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगातून मुलांना दिले गेले. येथे जमीन मुबलक आहे. त्या जमिनीने आजवर इथल्या माणसाला खूप काही दिले होते. या भूमीलाच उत्पादनाच्या दृष्टीने व वैचारिक दृष्टीने अधिक सक्षम बनवायला हवे होते. ते दांडेकर दांपत्याने केले. शास्त्रशुद्ध खणणे, वाफे तयार करणे, लागवड करणे, जोपासणे, वाढवणे, गांडूळ खत-शेणखत तयार करुन नैसर्गिक खतांचा वापर करणे याचे पद्धतशीर ज्ञान मुलांना दिले जाऊ लागले. मुले व शिक्षक दोघे मिळून प्रत्यक्ष शेतावर कामाचा अनुभव घेऊ लागले. अनुभवाविना शिक्षण व्यर्थ आहे, हे मर्म या दाम्पत्याने ओळखले व अनुभवाधिष्ठित अभ्यासक्रमाचे नियोजन आखले. मुलांना कलमांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले गेले. घरोघरी कलमे पोचवली गेली. प्रत्येक घरात भाज्यांची लागवड केली जाईल याकडे लक्ष पुरविले गेले. शिक्षण असे मुलांकडून शिक्षकांकडून घरोघरी पोचवले जात होते. विटा, सिमेंट, वाळू यांनी इमारती रचल्या जातात, पण गावाची रचना करता येत नाही. गावाची रचना करण्याचे रसायन वेगळे असते. वैचारिक व मानसिक घडणीचे रसायन असे नव्या पिढीच्या नवशिक्षणातून तयार कले जात होते.
लोकमान्य टिळक विद्यामंदिरात आठवी ते दहावीच्या वर्गांसाठी उभे केलेले ‘विश्वकर्मा टेक्नॉलॉजी सेंटर‘ ही व्यवसाय शिक्षणाची एक व्यवस्था इथे निर्माण करण्यात आली आहे. दहावीच्या अभ्यासक्रमातील सत्याएेंशीव्या क्रमांकाच्या व्यवसायशिक्षणाचा अभ्यासक्रम स्वीकारुन, त्यात आवश्यक तो बदल करुन, तीन वर्षात व्यवसाय शिक्षण विभागले आहे. या अभ्यासक्रमात इंजिनियरिग, शेतकी, पॅथॉलॉजी आणि होम सायन्स, ऊर्जा व पर्यावरण अशा चार विषयांचा अभ्यास आहे. प्रत्येकाला स्वतःची सगळी कामे करता यावीत व जगण्यासाठी आवश्यक किमान कामे करता यावीत हा उद्देश आहे.
पुस्तकी अभ्यासाबरोबर मुले प्रत्यक्ष जीवनशिक्षण घेऊ लागली. कामाच्या वाढत्या व्यापामुळे वर्गांची गरज वाढली. त्यासाठी श्रीमती आनंदी वल्हार यांनी आपली पाच एकराची जमिन दिली. मग मुलांच्या मदतीने एकेक वर्ग बांधले जाऊ लागले. पंधरा वर्षात ‘लोकमान्य धर्मादाय न्यासा‘ची ‘लोकमान्य टिळक विद्यामंदिर‘ची देखणी इमारत उभी राहिली. या डोंगराळ प्रदेशाची शान वाढवणारी आणि दांडेकर दांपत्याच्या कार्याची किर्ती वाढविणारी ही इमारत आहे. पुरेशा वर्गसंख्येबरोबर प्रशस्त सभागृह, समर्थ व्यायाममंदिर, मुलांचे आणि मुलींचे वसतीगृह, विश्वकर्मा टेक्नॉलॉजी सेंटर आणि केवळ विद्यार्थ्यांच्या मदतीने कातळ फोडून तयार झालेले भव्य असे ‘क्रांतीसूर्य वासुदेव बळवंत फडके क्रिडांगण‘ हे आज शाळेचे नजरेत भरणारे रुप आहे. त्याच्या निर्मितीमागे अफाट पण नियोजनबद्ध परिश्रम आहेत. परिपूर्णतेने शाळा सुरु झाल्यानंतर व्यवसाय-शिक्षणाचेही छोटे पण स्पष्ट चित्र दिसू लागले आहे. मुले आणि शिक्षक यांचा अनुबंध जुळला. इथले शिक्षकही परिसराच्या बाहेरुन आलेले असले तरी इथे चांगलेच रुजले आहेत.
आज शाळेमध्ये २५० विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या २५ वर्षात हजारो विद्यार्थी शाळेबाहेर पडले आहेत. त्यातील कोणी डॉक्टर, वकील, शेतकरी शिक्षक झाले आहेत. अनेकांनी शहराची वाट न धरता आपल्या गावच्या विकासासाठी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. केवढं मोठं यशाचं माप आहे हे! जे बी रुजवलं होतं त्यातून डौलदार झाड तयार झालं आहे. त्याची फळे-फुले कुटुंबियांना, गावक-यांना खायला मिळत आहेत.
प्रयोगाचा व्यापक संदर्भ-
वर्षानुवर्षाच्या मानसिकतेत, जुनाट कल्पना-विचारांमध्ये अडकलेल्या गावात काही रुजवायचे असेल, नवनिर्माण करायचे असेल तर ‘शिक्षण‘ हे एकमेव माध्यम दांडेकर कुटुंबियांनी मानले. त्या ध्येयाला चिकटून स्वप्नाला सत्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांचे स्वप्न आता सत्यात उतरु लागले आहे. शाळेच्या या प्रयोगातून इतर शाळाही सहजपणे वाटचाल करु शकतील एवढा विश्वास या संस्थेने निर्माण केला आहे.
-लोकमान्य टिळक विद्यालय, चिखलगाव-दापोली

विशेष बातम्या *
भ्रष्ट राज्यकर्ते देशही विकतील!त्यांना दूर करा-प्रमोद जठार
ज्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या वृद्ध कलावंतांना पेन्शन देण्यासाठी, शालेय मुलांना परिपूर्ण शिक्षण, शिक्षणसेवकांना मानधन, ७० टक्के अपंगांना निराधार योनजेंतर्गत ५०० रुपये पेन्शन देण्यास या शासनाकडे पैसा नाही. राज्यातील गरिबांसाठी काही करता येत नाही. मात्र या राज्यकर्त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आतापासून सज्ज व्हा. अन्यथा हे राज्यकर्ते देश विकायला कमी करणार नाहीत, अशा परखड शब्दांत भाजप आमदार प्रमोद जठार यांनी वेंगुर्ले येथील सभेत आघाडी शासनावर टीका केली.
भाजपतर्फे मंत्रालयावर नेण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांची चाललेली मनमानी, भ्रष्टाचाराच्या मालिका, गोरगरीब जनतेवर होणारे अन्याय याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. वेंगुर्ल्यात माणिक चौक येथे जाहीर सभा झाली. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष बाबा राऊत, सरचिटणीस मिलिद केळुसकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष साईप्रसाद नाईक, कुडाळ तालुकाध्यक्ष गुरुनाथ दामले, वेंगुर्ले शहराध्यक्ष दर्शेश पेठे, नगरसेवक संजय तुळसकर, विशाल सावळ उपस्थित होते.
दोन वर्षात माफियागिरी वाढली असून भ्रष्ट राज्यकर्त्यांनी देशाला पोखरुन काढले आहे. आतातर जिल्हा परिषदेतील घोटाळे व भ्रष्टाचारही बाहेर पडू लागले आहेत. भाजपातर्फे माफिया राज्यकर्त्यांकडून पदोपदी होणारा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी तसेच शासनविरोधात मोहिम उघडली जाणार आहे असे आ. जठार यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस मिलिद केळूसकर यांनी तर आभार साईप्रसाद नाईक यांनी मानले.

कोकण पर्यटन विकासासाठी केंद्राचे २२५ कोटी
कोकणाच्या पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने २२५ कोटी रुपये मंजूर केले असून त्यातील सिधुदुर्गला ८३ कोटी तर रत्नागिरीला ५२ कोटी ५७ लाख मिळणार आहेत. आमदार राजन तेली यांचा तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. १२व्या वित्त आयोगातून हा निधी प्राप्त झाला आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यात ७४ कोटी रुपयांची २८ कामे मंजूर करण्यात आली आहेत. पर्यटन विकास महामंडळाच्या उदासीन धोरणामुळे सिधुदुर्गचा अपेक्षित पर्यटन विकास होऊ शकलेला नाही अशी टीकाही राजन तेली यांनी केली.
जिल्ह्याला मिळालेल्या निधीतून ८ कोटी २५ लाख खर्च झाला असून विजयदूर्ग व सिधुदुर्ग येथे सर्किट हाऊस, तारकर्ली येथे जेटी, धामापूर, आंबोली येथे पर्यटक निवास, वेंगुर्ले - सागरेश्वर येथे तंबू निवास ही कामे झाली आहेत. अशी माहिती देण्यात आली.

कोकण महोत्सव जागतिक पातळीवर नेणार
मुंबईत ग्लोबल कोकण महोत्सवाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पहाता कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे नागपूर, नाशिक, औरंगाबाद व पुणे या शहरांमध्ये ‘मिनी फेस्टीव्हल‘ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच लंडनच्या वर्ल्ड फेस्टीव्हलमध्येही आपण कोकण घेऊन जाणार असल्याचे घोलवड (ठाणे) येथे झालेल्या सिधुदुर्गातील कृषी पर्यटन केंद्र चालकांच्या कार्यशाळेत बोलतांना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी सांगितले.
या कार्यशाळेत कार्यवाह मिनल ओक, अध्यक्ष प्रभाकर सावे, सिधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळ परुळेकर आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत अनिल सावे, चंद्रहास चौधरी, अश्विनी हिरोजी, संकेत दळवी (गुहागर), आशिष अमृते (दापोली), विलास सावंत (डिगणे), पुरुषोत्तम प्रभू (कुडाळ), रामानंद शिरोडकर (सावंतवाडी) सौ.अश्विनी फाटक (आसोली), संजय मालवणकर (वेंगुर्ले), सुभाष परब (कुडाळ), सुरेश गवस (दोडामार्ग), संजय देसाई (डेगवे), रणजीत सावंत (सावंतवाडी), अरविद चव्हाण (मालवण), मनोहर देसाई (डेगवे), प्रफुल्ल कदम (दुर्गावाडी), सौरभ नाईक (खानोली), रमेश गावकर (वेत्ये), जर्नादन पोकळे (निरवडे), रविद्र गांवकर (वेत्ये), सुनिल नाईक (मडुरा), नंदकिशोर रेडकर (रेडी), शैलेश पालकर (दुकानवाडी), मनोहर देसाई (डेगवे), सुभाष मुठये (कवठणी), दिपक पोकळे (सावंतवाडी), सुनिल गावडे (मडगांव), चारुदत्त सोमण (देवगड) हे सहभागी झाले होते.

भंडारी मंडळाचे सिधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ३२ हजार रुपयाचे वाटप
भंडारी मंडळ दादर ही संस्था १०४ वर्ष कार्यरत असून वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. शैक्षणिक क्षेत्रात भंडारी समाजातील जी मुलेमुली खेडोपाडी शाळेत शिकत आहेत व ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे अशा मुलांना आर्थिक मदत देणे हे भंडारी मंडळ आपल्या समाज कार्यातील प्रमुख उद्दिष्ट मानते. त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे, तुळस, मातोंड, आसोली, न्हैचिआड, केरवाडा, उभादांडा तसेच मालवण वडाचा पाट येथील शळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे काम मंडळाचे पदाधिकारी गेली अनेक वर्षे करीत आहेत.
भंडारी मंडळाचे मुख्य चिटणीस सुधीर नागवेकर, शिष्यवृत्ती समितीचे सचिव रुपेश तुळसकर, कार्यकारिणी सदस्य अॅड. भालचंद्र गवंडे, नितीन आंबेरकर यांना यावर्षी स्वतः या शाळांमध्ये जाऊन समाजातील ४४० मुलांना प्रत्येकी रु. ३०० प्रमाणे एक लाख बत्तीस हजार रु. चे वाटप केले. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य यश केरकर व शंकर पोखरे हे आरोंदा येथे शाळेत तर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब परुळकर हे तुळस व वेंगुर्ला शाळेत उपस्थित होते.
आवाहन - या शैक्षणिक कार्यासाठी समाजाकडे ठेव ठेवून समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी भंडारी मंडळ, दादर येथे सायं. ६ ते ८ यावेळेत २४३०५४२५ वर संफ साधावा किवा मुख्य चिटणीस सुधीर नागवेकर यांच्याशी ९००४४१४३४३ वर संफ साधवा.

वेंगुर्ले पोलिसांना बक्षिसे
कोकण परिक्षेत्रात मोटारसायकल चोरीप्रकरणी एप्रिल २०१० मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांना पाच हजार रुपयांचे बक्षिस व सी नोट (सन्मानाचा शेरा), तर या तपासकामी सहकार्य करणा-या पोलीस कर्मचा-यांना रोख रकमेची पारितोषिके व ‘जीएसटी‘ हा सन्मानाचा शेरा कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक परमवीर सिग यांनी नुकताच जाहीर केला आहे.
उपनिरीक्षक एस.व्ही.मोहीते यांना तीन हजार रुपये व सी नोट, पोलीस हवालदार पी.जी.मोरे, आर.एस.जाधव, आर.के. उबाळे, पोलीस नाईक एस.एस.कांबळे, एम.जी.चिदरकर, एम.व्ही. गुजर, एस.टी.जाधव, पी.एस.धुमाळे, सहा. पोलीस फौजदार यु. एल. कामत,पोलीस शिपाई व्ही.एस.जाधव, डी.के.दळवी, कॉन्स्टेबल ए.डी.भांडिये,पी.एस.कदम या वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना प्रत्येकी ५०० रु. ‘जीएसटी‘ पारितोषिके जाहीर केली आहेत.

जनसंवाद‘च्या स्पर्धेला ‘किरात‘चे प्रभाकर खाडीलकर यांना राज्यस्तरीय पारितोषिक
पुणे येथील ‘जनसंवाद‘ संस्थेने २०१०च्या दिवाळी विशेषांकांच्या माध्यमातून ‘सामाजिक बांधिलकी‘ या विषयावर अनुभव कथनाची राज्यव्यापी स्पर्धा घेतली होती. राज्यभरातून स्पर्धेसाठी निवडलेल्या दिवाळी अंकांत ‘किरात‘ दिवाळी अंकाचा समावेश होता. त्याचप्रमाणे किरातने केलेल्या आवाहनानुसार किरातच्या सहा वाचकांनी आपले अनुभवकथन स्पर्धेसाठी पाठविले. त्यातून निवड करुन प्रा.पी.जी.देसाई (बॅ.खर्डेकर कॉलेज,वेंगुर्ले), श्री. जयराम बावलेकर (सावंतवाडी) आणि श्री. प्रभाकर खाडीलकर (सांगली) यांचे लेख राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले होते. निवडलेल्या तीन लेखांना जनसंवादातर्फे प्रोत्साहनपर प्रत्येकी १०० रु. किरातकडून देण्यात आले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नामांकित लेखक, पत्रकार, प्राध्यापक, समिक्षक, सामाजिक कार्यकर्ते असे परीक्षक होते. त्यांनी निवडलेल्या प्रथम तीन क्रमांकांमध्ये ‘किरात‘चे वाचक व लेखक सांगलीचे श्री. प्रभाकर खाडीलकर यांना तिस-या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. १) सई महादेव दळवी (मुंबई) - रुची दिवाळी अंक, मुंबई-रु.३००१, २)सरल आडगांवकर, (नागपूर) - अक्षरवैदर्भी-अमरावती - रु. २००१, ३) प्रभाकर खाडीलकर (सांगली) - सा. किरात दिवाळी अंक वेंगुर्ले - रु. १००१.
पारितोषिक वितरण जनसंवादच्या खास कार्यक्रमात लवकरच पुणे किवा मुंबई येथे आयोजित करण्यात येईल असे संयोजक सु. गो. तपस्वी यांनी कळविले आहे.

Thursday 17 March, 2011

अंक १०वा, १७ मार्च २०११

संपादकीय *
ग्लोबल कोकण
सुमारे पंचवीस वर्षापूर्वी ‘कोकण विकास‘ या विषयावर पुणे येथे एक परिषद झाली होती. माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया या परिषदेचे प्रमुख आयोजक होते. या परिषदेत कोकण विकासावर सांगोपांग चर्चा झाली. रेडीतील खाण मालक व बेळगावचे उद्योजक रावसाहेब गोगटे यांनी कोकणाचे नंदनवन करण्याची कल्पना मांडली. इतरही अनेक राजकीय नेते मंडळींनी आपापल्या कल्पना मांडल्या होत्या. कोकणातील रस्ते, बंदरे, पर्यटन, फलोद्यान अशा अनेक विषयांवर चर्चा झाली होती आणि त्याच विषयांच्या अनुषंगाने आजही चर्चाच होते आहे. तशीच ती २४ ते २७ फेब्रुवारीला मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलामध्ये झालेल्या कोकणभूमी प्रतिष्ठानच्या ग्लोबल कोकण महोत्सवातही झाली.
‘कोकण विकास आणि पुणे परिषद‘ या शीर्षकाखाली पंचवीस वर्षापूर्वी ‘किरात‘मध्ये लिहिलेल्या संपादकीय लेखात पुणे येथील त्या परिषदेचा परामर्श घेताना कोकण विकासाकरिता नेमके काय केले पाहिजे त्याविषयीही लिहिले होते. परंतू तेव्हाही अस्तित्वात असलेला दोन राजकीय पक्षांमधला किवा एकाच पक्षातील दोन गटांमधला परस्पर संघर्ष आजही चालू राहिलेला आहे. त्यामुळे कोकण विकासाच्या सर्वच योजनांना खीळ पडत आहे. विकासाची म्हणून जी काही कामे होतात ती नियमित प्रशासकीय कामांचाच एक भाग म्हणून होत आहेत. भ्रष्ट कारभारामुळे ती कामे निकृष्ट होतात. पण त्यामध्येही श्रेय घेण्यावरुन राजकीय पक्ष किवा दोन गटात चढाओढ लागलेली दिसते. शिवाय अवाजवी राजकीय हस्तक्षेपामुळे कोकणाचे प्रश्न आहेत तिथेच राहिले आहेत.
केंद्र व राज्य सरकारने दिलेला निधी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात विविध विकास योजनांवर खर्च होत असतो. तो अपुरा पडतो म्हणून सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दुप्पट केला. परंतू त्यापूर्वी मिळणारा निधीही कोकणातील जिल्ह्यात संपूर्ण खर्चच होत नाही असे दिसून आले. तिथे आता दुप्पट मिळालेला निधी पूर्णतः कसा खर्च पडणार? आत्ताच अनेक खात्यांमधला निधी खर्च न होता परत जाणार अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत.
पालकमंत्री नियोजन विकास आराखड्याचा आढावा घेतात. प्रत्येक खात्याचा सर्वच्या सर्व निधी मार्च अखेरपूर्वी खर्ची पडलाच पाहिजे म्हणून अधिका-यांना तंबी देतात. प्रशासनही खात्यातील अपुरा कर्मचारी वर्ग, अधिका-यांची रिक्त पदे आणि निधी खर्ची घालण्याचे ज्या अधिका-यांना अधिकार आहेत त्यांचे आपल्या व अन्य जिल्ह्यांशी आणि तेथील मंत्र्यांशी असणारे हितसंबंध, कंत्राटातील टक्केवारीत लोकप्रतिनिधींचा वाढलेला हिस्सा अशा अनेक कारणांनी मंजूर असलेला निधी खर्चच होत नाही. यातील बहुतेक निधी हा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी असतो. कोकणखेरीज अन्य जिल्ह्यांना मिळालेला व कोकणातील जिल्ह्यांचा खर्ची न पडलेला निधी मिळून इतर अनेक जिल्ह्यात भरपूर निधी खर्च होत असतो. मंजूर निधीला कशा वाटा फुटतात हे संबंधितांना चांगलेच माहित असते. कोकणापुरते पहायचे झाले तर प्राप्त झालेल्या निधीला फुटलेल्या वाटा इथेही तशाच आहेत. खर्च झालेल्या निधीतून झालेली कामे काय दर्जाची आहेत. त्यातही किती जणांचे हितसंबंध आहेत हे तपासून पाहणे हा शोध पत्रकारितेसाठी उत्तम विषय होईल.
सरकारवर अवलंबून राहिल्यामुळे विकास योजनेचे कसे तीन तेरा वाजतात हा अनुभव असल्याने कोकणच्या पर्यटन विकासासाठी एक स्वयंसेवी संस्था निर्माण करण्याचे काही मंडळींनी ठरविले आणि त्यानुसार ग्लोबल कोकण संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेतर्फे मुंबईत झालेल्या महोत्सवाला सारस्वत बँक, निर्माण ग्रुप यासारख्या संस्था व उद्योजकांचे प्रायोजकत्व लाभले होते. राज्याचे माजी मुख्य सचिव द.म.सुकथनकर हे या ग्लबल कोकण महोत्सवाचे अध्यक्ष आणि माजी खासदार, सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर हे आयोजन समितीचे चेअरमन होते. त्यांच्यामुळे या महोत्सवाला भारदस्तपणा आला होता. उद्घाटनाला मुख्यमंत्री, समारोपाला उपमुख्यमंत्री तसेच पर्यटनमंत्री, कोकणातील नारायण राणे व सुनिल तटकरे हे दोन मंत्री असा सत्ताधारी जामानिमाही या महोत्सवाला लाभला.
महोत्सवात कोकणातील लोककला, खाद्यपदार्थ, विविध उत्पादने, पर्यटन आदींचे सादरीकरण झाले. कृषीपर्यटन, फलोद्यान, पायाभूत सुविधांचा विकास, इ. विषयांवर परिसंवाद झाले. मुंबईतील कोकणी लोकांचाही सांस्कृतिक व खाद्य महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला.
यापूर्वी दामोदर हॉल व प्रांगणात मुंबईतल्या मालवणी बोलीभाषेच्या सिधुदुर्गवासीयांनी मालवणी जत्रौत्सव यशस्वी केले होते. ग्लोबल कोकण हे त्याचेच कोकणातील चार जिल्ह्यांचा समावेश असलेले मोठे रुप होते. पंचवीस वर्षापूर्वी पुण्यात झालेल्या कोकण विकास परिषदेतलेच प्रश्न कमी जास्त प्रमाणात आजही आहेत. आता मुंबईतल्या या ग्लोबल कोकण महोत्सवातून फलनिष्पत्ती कोणती आणि कशी निर्माण होते हे पहावयाचे.

अधोरेखित *
महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलचा महाभ्रष्टाचार
फ्लोरेन्स नाइंटिगेल ही जगातील पहिली नर्स. आधुनिक नर्सिग म्हणजेच शुश्रुषेचा पाया त्यांनी घालून दिला. भारतामध्ये सर्वप्रथम १६६४ मध्ये मुंबईत मिलिटरी नर्सिग स्कूलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मिशन हॉस्पीटल अंतर्गत नर्सिग स्कूल्स स्थापन करण्यात आली.
वैद्यकीय व्यवसायात देशात परदेशात मिळणा-या नोकरीच्या असंख्य संधी असल्यामुळे नर्सिगचे शिक्षण घेणा-या मुलांचा ओढा वाढला. नर्सिगचे शिक्षण देणा-या संस्था गावोगाव उघडल्या. या सर्व शिक्षण संस्थांवर नियंत्रण ठेवणारी संस्था महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे.
महाराष्ट्र शासनाने नागपूर अधिवेशनात महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलच्या अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन व अनेक तक्रारींवरुन महाराष्ट्र सरकारने नर्सिग कौन्सिल बरखास्तीचा निर्णय १८-१२-२०१० रोजी घेतला. सदर निर्णयानंतर कौन्सिलवर प्रशासक म्हणून डॉ. डी. एन. लांजेवार यांची नेमणूक करण्यात आली. या सर्व प्रकरणात उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना रामलिग माळी यांनी कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेवू नयेत असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही रामलिग माळी यांनी कौन्सिलचा पदभार दादागिरी व जबरदस्तीने स्विकारला असल्याचे आरोप आहेत.
नर्सिग कौन्सिलचे माजी अध्यक्ष रामलिग माळी यांनी कायदा धाब्यावर बसविला.
० कौन्सिलवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. डी. एन. लांजेवार यांच्याकडे पदभार न देता स्वतःच कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून कारभार चालविणे.
० कोर्टाचे आदेश धुडकावून कौन्सिलचे धोरणात्मक निर्णय म्हणजे परिषदेची बैठक घेणे, नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी समित्या नेमणे, रजिस्ट्रार नेमणे इत्यादी निर्णय माळींनी घेतले.
० उच्च न्यायालयाच्या आदेशाचा धडधडीत अवमान होत असतानाही सरकारने आणि डॉ. विजयकुमार गावित मंत्री असलेल्या वैद्यकीय शिक्षण खात्याने माळी यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
नवीन कॉलेजचा प्रस्ताव मान्य करण्यासाठी मागितली जाते लाच-
जी.एन.एम. किवा ए.एन.एम. कॉलेजचा सेटअप तयार करुन जेव्हा एखादी संस्था कॉलेजच्या मान्यतेसाठी प्रस्ताव करुन पाठविते तेव्हा कोणतीही पाहणी न करता प्रस्ताव मान्य करण्यासाठी संस्था चालकांकडून लाखो रुपयांची मागणी केली जाते. अशा प्रकारची लाच देण्यास नकार देणार्‍या संस्थाचालकांच्या संस्थेची मान्यता कोणत्याही समितीच्या पहाणीशिवाय रद्द होते. यवतमाळ, नागपूर, कोल्हापूर, पेण येथील संस्थांचे प्रस्ताव अशाच प्रकारे रद्द करण्यात आले आहेत. या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सध्या चालू आहे.
कुडाळ येथील बॅ. नाथ पै नर्सिग स्कूलचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी या कौन्सिलच्या महाभ्रष्टाचाराविरोधात आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी वारंवार पत्राद्वारे, समक्ष भेटून पाठपुरावा चालू ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाने विधानभवनाबाहेर उपोषणाचे हत्यार तूर्त थांबविले असेत तरी भ्रष्टाचाराविरोधातली लढाई आपण पुढे चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘लाच देणे हा लाच घेण्याइतकात गंभीर गुन्हा आहे.‘ शिक्षणासारखे आणि त्याहूनही पवित्र अशा नर्सिग शिक्षणाला मान्यता देणा-या कौन्सिलमधील या महाभ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येतेय. सातत्याने उघडकीला येणा-या अशा प्रकारांमुळे एकूण शिक्षण व्यवस्थेचा आणि त्यामध्ये काम करणा-या सरकारी अधिका-यांविषयीचा जनमानसातील आदर मात्र झपाट्याने कमी होतोय.
शिक्षणातला हा महाभ्रष्टाचार केवळ नर्सिग कोर्स पुरताच मर्यादित नाही. शिक्षणाची सर्व अंगे या भ्रष्टाचार्यांनी व्यापलेली आहेत. त्याबाबत संबंधितांच्या सातत्याने तक्रारी आल्यावर वरीष्ठ अधिका-यांकडून चौकशीचे नाटकही पार पाडले जाते. पण कठोर कारवाई कोणावरच होत नाहीशिक्षण खात्याचे जिल्हा आणि विभागीय पातळीवरचे अधिकारी बिनदिक्कतपणे बेकायदेशीर निर्णय घेतात. शिक्षण संस्थाचालकांवर ते लादतात. सरकारी नियमांचीच पायमल्ली करतात आणि कायद्याचे, नियमांचे पालन करणा-यांची छळणूक करतात असे चित्र सर्वच जिल्ह्यांतून दिसून येत आहे.
राज्य सरकारच्या वेतन (वाढ) आयोगाने भरघोस वेतन देऊन सुद्धा सरकारी पातळीवरचा हा भ्रष्ट उपचार थांबलेला नाही. उलट त्याच्या रकमेत वाढच झालेली आहे. हे कुठवर चालणार? आणि आपण चालवून घेणार?
- अॅड.शशांक मराठे, ९६८९९०३३७९

विशेष *

जि.प.च्या शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ
आजच्या घडीला ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे हे जिकिरीचे झाले आहे. त्यातच सरकार रोज नव्या नव्या नियमांची भर घालत आहे. या सा-या बाबींचा गैरफायदा शिक्षण खात्यातील मंडळी बेमालूमपणे घेत असतात. त्यामुळे शिक्षण खाते आणि शिक्षण संस्था भ्रष्टाचाराची कुरणे होऊ लागली आहेत.
शिक्षण संस्थांमध्ये संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच सर्व स्तरांवर गुणात्मक वाढ करणे गरजेचे असून प्राचार्य व शिक्षकांनी शालेय शिक्षण आल्हाददायक तसेच तणावमुक्त करण्याची सूचना राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी (२४ नोव्हेंबर) केली आहे. वरीष्ठ स्तरावरुन शिक्षणक्षेत्राविषयी असे विचार व्यक्त होत असतानाच जिल्हा परिषदेच्या पातळीवर शिक्षणव्यवस्थेचे कसे धिडवडे काढले जातात आणि जाणीवपूर्वक तणाव वाढविले जातात याचे सिधुदुर्ग जिल्हा हे एक मोठे उदाहरण आहे.
सिधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण बहुमत आहे. पालकमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या या जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी सदस्यच आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा आणि विषय समित्यांच्या सभांमध्ये भ्रष्टाचारावर आसूढ ओढू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे आहेत, या विरोधकांच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
एरवी विरोधी पक्षाचे सदस्य नेहमीच सभागृहात सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी प्रशासन व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रकाश पाडत होते. सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवित होते. त्यातूनच आतापर्यंत शिलाई मशीन्सची खरेदी, औषधे खरेदी, निकृष्ट प्रतीचा आणि किडी-अळ्या पडलेला शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियानांतर्गत केलेल्या अनेक प्रकारच्या खरेदीत आणि बांधकामात आर्थिक घोटाळा असल्याचे यापर्वीच स्पष्ट झाले आहे.
सिधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिका-यांनी मांडलेल्या उच्छादाचा लेखाजोखा आता माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या कोकण विभागाचे कार्यवाह सुधाकर तावडे आणि दुर्गम अशा दोडामार्ग तालुक्यातील एका खाजगी माध्यमिक शाळेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलेल्या तक्रारीची छाननी करण्यासाठी सिधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. पाटील यांनी चौकशीअंती सादर केलेला अहवाल शिक्षण खात्यातील अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारावर प्रकाश पाडणारा आहे. या अहवालानुसार, शिक्षणाधिकारी या पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणा-या तत्कालीन दोन अधिका-यांनी एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवतील अशी कटकारस्थाने संस्था चालकांविरुद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारच्या नियमावलीनुसार प्रत्येक खाजगी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला दरवर्षी काही कागदपत्रे सादर करुन शिक्षणाधिका-यांची मंजूरी घ्यावी लागते. त्यात नव्या शिक्षकांच्या नेमणुका, सेवाज्येष्ठता, रजा, पगारवाढ, राखीव जागांची पूर्तता अशा विविध बाबींचा समावेश आहे. या मंजु-या घेतल्या नाहीत, तर संबंधित शिक्षण संस्थेविरुद्ध कारवाई होऊ शकते. आजच्या घडीला ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे हे जिकिरीचे झाले आहे. त्यातच सरकार रोज नव्या नव्या नियमांची भर घालत आहे. या सा-या बाबींचा गैरफायदा शिक्षण खात्यातील मंडळी बेमालूमपणे घेत असतात. त्यामुळे शिक्षण खाते आणि काही शिक्षण संस्था भ्रष्टाचाराची कुरणे होत आहेत.
सिधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील शिक्षणाधिका-यांनी दोडामार्ग तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेला ‘गोत्या‘त आणण्यासाठी कशी चाल रचली हे पाटील यांच्या चौकशी अहवालात सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहे. दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शाळेव्यतिरिक्त देवगड, मालवण, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या तालुक्यांतील खाजगी शिक्षण संस्थांवरही शिक्षणाधिका-यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी परस्परांच्या संगनमताने अन्याय केला असल्याचे पाटील यांनी अहवालात म्हटले आहे.
चौकशी अधिकारी पाटील यांनी आपल्या अहवालात तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी राम नाईक तसेच बी. एम. किल्लेदार, अधीक्षक जी. आर. लिखारे, सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक एस. डी. डवरी, अधीक्षक गजानन खोचरे आदींनी त्यांच्या कर्तृत्वात कसूर केल्याचे निष्कर्ष काढले असून या सर्वांवर उचित कारवाई करण्याची शिफारस केली आहे. काही जणांवर फौजदारी करावाई केली जावी असेही पाटील यांनी सुचविले आहे.
भ्रष्टाचाराची लागण सिधुदुर्गातच नाही तर ती अन्यत्रही आहे. महिलांवर होणा-या अन्यायाविरोधात आजकाल बरेच लिहिले बोलले जाते. मात्र ग्रामीण भागातील निमशासकीय व खाजगी शाळांतील शिक्षकांना विशेषतः तरुण, विधवा, परित्यक्ता शिक्षिकांना, शिक्षण खात्यातील अधिका-यांच्या जाचांना सामोरे जावे लागते. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराची जी माहिती विविध मार्गाने आज उजेडात येते, ती हिमनगाचे टोक आहे. खोलवर जाऊन त्या भ्रष्टाचाराचा शोध घेणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
- कुमार कदम, पत्रकार-मुंबई

व्यक्तिविशेष - श्रीराम मंत्री
एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करुन जर एक विधायक नरजेचा माणूस आयुष्यभर निष्ठेने काम करत राहिला तर कुठल्या ताकदीचं काम करु शकतो याचा परिपाक म्हणजे श्री. श्रीराम मंत्री आणि गेली ५५ वर्षे कार्यरत असणारे उपनगर शिक्षण मंडळ. आज या मंडळाच्या १४ शैक्षणिक शाखा विद्यादानाचे काम करीत आहेत. मूल्यांचा ध्यास सामाजिक पुनरुत्थानाची आस, सचोटीचा व्यवहार आणि प्रचंड उर्जा एवढी पुंजी बरोबर घेऊन श्रीराम मंत्री त्यांच्या काही मोजक्या समविचारी मित्रांबरोबर शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याच्या विचाराने पुढे सरसावले.
‘वचितांचे शिक्षण‘ हे प्रमुख उदिष्ट डोळ्यांसमोर ठेवून १८ नोव्हेंबर १९५६ रोजी उपनगर शिक्षण मंडळाची स्थापना केली. अंधेरी येथे भाड्याने जागा घेऊन गरजू विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा सुरु केली. पुढे सांताक्रूजला दुसरी रात्रशाळा सुरु केली. या शैक्षणिक उपक्रमाच्या रोपट्याचे आज विद्यानिधी संकुलासारख्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
विविध संस्था-जुहू विलेपार्ले पश्चिम येथील शांत रमणीय परिसरात आज विद्यानिधीची भव्य, सुंदर, सर्व शैक्षणिक सुविधांनी सज्ज अशी इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. येथे मराठी व इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक पासून माध्यमिक पर्यंत वाणिज्य, विज्ञान यांची व्यवसाय केंद्री कनिष्ठ महाविद्यालये आहेत. याशिवाय विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमी आणि कमला रहेजा विद्यानिधी वास्तुकला महाविद्यालयही आहे. श्रीराम मंत्री यांच्या आश्वासक आधारामुळे हे संकुल ‘गगन सदन तेजोमय‘ झाले आहे. तंत्रज्ञानाचे मुलभूत शिक्षण ही आधुनिक काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी दहावी उत्तीर्ण मुलांसाठी लघुव्यवसायाचे किमान कौशल्ये शिकविणारे अभ्यासक्रम सुरु केले. या सर्व विधायक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या गुणग्राहकतेच्या जोरांवर सर्व सहाका-यांना सहभागी करुन एक आदर्श निर्माण केला.
स्थानिय ते राष्ट्रीय संस्थांमध्ये सक्रिय सहभाग - केशवसृष्टी या उत्तन - भाईंदर जवळच्या निसर्गसुंदर ठिकाणी ‘रामरत्न विद्यामंदिर‘ ही इंग्रजी माध्यमाची मुलांची शाळा उभारण्यात श्रीराम मंत्री यांचा सिहाचा वाटा आहे. उत्तन विविधलक्षी शिक्षण संस्थेचे काही वर्षे ते अध्यक्ष होते. त्यांचे नेतृत्व लाभलेल्या काही संस्था म्हणजे ‘‘भारतीय शिक्षण मंडळ‘‘, ‘‘विद्याप्रतिष्ठान महाराष्ट्र‘‘, ‘‘विद्याभारती‘‘ व ‘‘अमलविद्यावर्धिनी राजापूर‘‘.
पुढील उपक्रम - कै.डॉ.जे.पी.नाईक यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २००७ साली ‘‘अंतर्वेध‘‘ या नावाने ‘‘अनुसंधान आणि शैक्षणिक विकास‘‘ या विषयावर ते कार्यरत झाले आहेत.
साहित्यिक रुची - श्रीराम मंत्री यांच्या लोकसंग्रहामध्ये त्यांच्या सुंदर पत्रलेखनाचा महत्त्वाचा वाटा आहे. मोजक्या शब्दात आशयघन पत्र लिहिणं ही त्यांची खासियत. दुस-याच्या सुखदुःखात सामावून जाणारी, भावनेचा ओलावा जपणारी त्यांची पत्रे अनेकांनी जपून ठेवली आहेत. काव्यशास्त्रविनोदात विशेष रस असलेले श्री. श्रीराम मंत्री उत्स्र्फूत नर्म विनोदाने वातावरणात सहज प्रसन्नता आणतात.
जन्मगांव वेंगुर्ले - नैसर्गिक सौंदर्यांची मुक्त उधळण असलेले ‘वेंगुर्ले‘ हे श्रीराम मंत्री यांचे जन्मगाव. तरुण वयातच त्यांच्या मनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे संस्कार ठसले. आपण समाजाचं देणं लागतो ही भावना तेव्हापासून मनात रुजली. मंत्री यांच्या अफाट कार्यकर्तृत्वात त्यांच्या पत्नी रेखाताई यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. अविरत कष्ट सोसून त्या आपल्या पतीच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. दुर्देवाने डिसेंबर २००५ मध्ये त्यांचे निधन झाले.
उपगनर शिक्षण मंडळाच्या कामाचा व्याप सांभाळून मंत्री यांनी काही दर्जेदार पुस्तकांचं लेखनही केलं. शिक्षणक्षेत्राविषयी मौलिक विचार मांडणारं ‘वेध शिक्षणाचा‘ माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशित झालेले ‘आत्मविकासाकडून परम वैभवाकडे‘, ‘वेंगुर्ल्याचे लोकजीवन‘ तसेच पूर्वेतिहासाबरोबर शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक उलाढालीचा आढावा घेणारे ‘फकाणा-गजाली वेंगुर्ल्याचे‘,‘आठवणीतील म्हणी आणि हुमाणी‘ ही सर्व पुस्तके मुद्दाम संग्रही ठेवावीत अशीच आहेत.
शुभेच्छा - वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत कार्यरत असणारे श्रीराम मंत्री यांची अचाट स्मरणशक्ती, शांत सतेज मुद्रा, ओसंडून वाहणारा उत्साह आपल्याला स्तंभित करतो! आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या चेहे-यावर दिसणारी कृतार्थतेची भावना विलक्षण समाधान देऊन जाते. या ज्ञानऋषीने जोपासलेल्या, वाढविलेल्या अभिनव शैक्षणिक चळवळीला मनःपूर्वक शुभेच्छा!

बातम्या *
महिलांवर आर्थिक जबाबदारीचा बोजा नको -असुंता पारधे
महिलादिनी वेंगुर्लेत श्रमजीवी महिलांचा सत्कार

महिला आज सर्वच क्षेत्रात चमकू लागल्या आहेत. पण तरीही त्यांचे प्रश्न अद्याप संपलेले नाहीत. अन्य संकटाबरोबर महिलांसमोर आता आर्थिक संकटही उभे आहे. आजही महिला खूप तणावाखाली आहे. संसाराच्या जबाबदारी बरोबरच महिलांकडून आता आर्थिक जबाबदारीची अपेक्षा केली जात आहे. महिला जर आर्थिक जबाबदारी स्विकारत असेल तर पुरुषाने घर संसारातील गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे असे प्रतिपादन चेतना महिला विकास संस्थेच्या सचिव असुंता पारधे यांनी वेंगुर्ले येथे सा.किरात व नगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्यावतीने, गणेश मित्रमंडळाच्या सहकार्याने महिला सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलतांना केले.
नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात वेंगुर्ले तालुक्यातील प्रातिनिधीक १२ श्रमजीवी महिलांचा सत्कार करण्यात आला. घर संसारासाठी काबाड कष्ट करुन आपले संसार उभे करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तळागाळातील महिलांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. नगराध्यक्ष संदेश निकम, महिला बालकल्याण सभापती सौ. लक्ष्मी वेंगुर्लेकर, गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय तानावडे, संस्थापक सुजय गांवकर, नगरसेविका सौ. श्वेता हुले, सौ.सुचिता कदम, ‘किरात‘ च्या अतिथी संपादक सौ. सुमेधा देसाई, ‘किरात‘चे श्रीधर मराठे आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मत्स्यविक्री करणा-या छाया खोबरेकर, बस कंडक्टर सुप्रिया बोवलेकर, महिला पोलिस संजाली पवार, मत्स्य विक्रेत्या फातिमा मेंडिस, मंगल कार्यालय चालक पल्लवी गावडे, डॉ. सौ. अश्विनी माईणकर, निवृत्त शिक्षिका सौ. जयश्री शिवलकर, सफाई कामगार अनिता जाधव, डॉ. सौ. अनुश्री गावस्कर, अॅड. सुषमा खानोलकर, निलम गावडे, डॉ. सौ. क्लेरा होडावडेकर व मायादत्त आंबर्डेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘किरात‘च्या महिला दिन विशेषकांचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार अॅड. शशांक मराठे यांनी मानले.

काँग्रेसच्या फुगडी स्पर्धेत कुडाळचे दैवज्ञ मंडळ प्रथम
तालुका काँग्रेसतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित माजी आमदार शंकर कांबळी पुरस्कृत खुल्या महिला फुगडी स्पर्धेत कुडाळ येथील दैवज्ञ महिला मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.
साई दरबार हॉलमध्ये आयोजित या स्पर्धेत १९ महिला संघांनी भाग घेतला. फुगडीतील पारंपरिकतेचा बाज सांभाळत अनेक प्रकारांचे कौशल्यपूर्वक सादरीकरण केले. यावेळी जिजाऊ संस्थेच्या संस्थापक सौ. नीलम राणे यांनीही उपस्थिती दर्शविली. स्पर्धेत आजगांवचे रामेश्वर महिला मंडळ द्वितीय, सावंतवाडीचे दत्तप्रसाद महिला मंडळ तृतीय, मालवण येथील सिधूसखी, आरवलीतील सातेरी महिला समूहाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. बक्षिस वितरण शंकर कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे तालुका निरीक्षक बाळू कोळंबकर, जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती विजय परब, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पूजा कर्पे, तालुकाध्यक्ष प्राजक्ता चिपकर, पं.स.सदस्य वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, नगरसेविका लक्ष्मी वेंगुर्लेकर, सुमन निकम, उभादांडा सरपंच सुकन्या नरसुले, परबवाडा सरपंच इनासीन फर्नांडीस, सूर्यकांता महिला संस्थेच्या प्रविणा खानोलकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळू देसाई, जि.प.सदस्य दादा कुबल, परीक्षक सौ. प्रविणा आपटे (सावंतवाडी), सौ.अनघा गोगटे (वेंगुर्ले) आदी उपस्थित होत्या. यावेळी प्रेक्षकांसाठी ठेवलेल्या मोफत भाग्यवान प्रेक्षक योजनेचा ड्राॅ काढण्यात आला. सभागृहातील ५० भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू व तीन सौभाग्यवतींना साड्या देण्यात आल्या. पॉप्युलर क्लॉथ सेंटरच्या वतीने पैठणी साडीचा ड्राॅ सौ. अंकिता चव्हाण यांनी जिकला.
नगराध्यक्ष संदेश निकम, उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार साळगांवकर, शहराध्यक्ष सचिन शेटये, ख.वि.संघाचे अध्यक्ष मनिष दळवी, दादा सोकटे, नगरसेवक सुहास गवंडळकर, दादा केळुसकर, शेखर डिचोलकर, बिटू गावडे, विक्रम गावडे, राकेश खानोलकर, बाळू प्रभू आदी उपस्थित होते.


शिरोडा येथील भीषण आगीत ३० लाखाचे नुकसान
बाजारपेठ - शिरोडा येथे ११ मार्चच्या रात्री काही दुकानांना भीषण आग लागून सरकारी पंचनाम्यानुसार सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. रामचंद्र नायर यांच्या रेश्मा बेकरीचे १० लाख ३० हजार, वेंगुर्ले सभापती जगन्नाथ डोंगरे यांच्या जनता रेडिओ सव्र्हस या दुकानाचे ८ लाख ६५ हजार, शामसुंदर परब यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे ५ लाख १० हजार, गजानन वेंगुर्लेकर टेलर्स यांचे ८३ हजार ९५०, चंद्रकांत कुडतरकर यांचे ५० हजार ४००, संदीप राणे यांचे ५९ हजार २००, सुभाष नागवेकर यांच्या सुवर्णपेढीचे १८ हजार ४५० याप्रमाणे नुकसानीची नोंद तलाठी एस.एन.शिर्के, व्ही.टी.ठाकूर, तात्या हाडये, नीलेश परब, तानाजी सातोसकर यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार करण्यात आली आहे. रात्री आग लागल्याचे लक्षात येताच तेथील तरुणांनी व रहिवाशांनी धावाधाव करुन मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा केला. अनेकांच्या दुकानातील सामान बाहेर काढून वाचविले. वेंगुर्ले व सावंतवाडीहून बंब आल्यावर तासाभराने आग आटोक्यात आली. ही आग पूर्ववैमनस्यातून लावली गेल्याची तक्रार रामचंद्र नायर यांनी पोलीसात केली असून इतेश परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञातीबांधवांची कार्यकारिणी
गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुका उपसमितीच्या पुढील तीन वर्षासाठी नविन कार्यकारिणीची निवड नुकत्याच वेंगुर्ले येथे झालेल्या तालुका ज्ञातीबांधव स्नेहमेळाव्यात झाली. ६ मार्च रोजी झालेल्या तालुकास्तरीय स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी केले होते.
अध्यक्ष -डॉ. राजेंद्र श्रीकृष्ण गावस्कर, उपाध्यक्ष -दिगंबर आत्माराम नाईक, सौ. हेमा प्रताप गावस्कर, कार्याध्यक्ष-संजय विनायक पुनाळेकर, सचिव - अॅड. सौ.सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर, सहसचिव - नंदकिशोर पुनाळेकर, खजिनदार - सौ. सुजाता अजित पडवळ, सहखजिनदार-सौ. मोहिलनी मोहन पंडीत, सदस्य - दिगंबर मंत्री, सदाशिव कीर, सचिन वालावलकर, सौ. विद्या प्रकाश रेगे, डॉ. प्रसाद प्रभुसाळगांवकर, आशिष पाडगांवकर, प्रसाद प्रभूझांटये, मानद सल्लागार - गुरुनाथ प्रभूझांटये, श्रीमती सुशिला प्रभूखानोलकर.
यावेळी मावळत्या कार्यकारिणीचे अभिनंदन करुन नविन कार्यकारिणीच्या आगामी कार्याच्या नियोजनावर चर्चा झाली. वेंगुर्ला तालुक्यातील सर्व पोटभेदांसह ज्ञाती बांधवांचे सर्वांगिण सर्वेक्षण करुन शिक्षण, आरोग्य व संस्काराविषयक सुविधा पुरविण्याचे कार्यकारिणीने ठरविले आहे. यासंदर्भात तालुक्याशी संबंधीत ज्ञातीबांधवांनी उपयुक्त सूचना कराव्यात तसेच सहकार्य करावे असेही आवाहन नूतन कार्यकारिणीतर्फे सर्वांना करण्यात आले. कार्यकारिणीची पुढील बैठक रविवार दि. १० एप्रिल रोजी सायं. ४ वा. तुळस येथे मनोहर पडवळ यांच्या निवासस्थानी होणार आहे.

ऐश्वर्या दीनानाथ वेर्णेकर
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत राज्यात ४० हजार मुलांनी भाग घेतला त्यामध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी रौप्यपदके मिळविली. त्यापैकी एक बालवैज्ञानिक कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी असलेल्या ऐश्वर्यावी बाल वैज्ञानिक स्पर्धेत रौप्यपदक पटकवायची ही दुसरी वेळ. इयत्ता सहावीमध्ये देखील राज्यस्तरावर तिने रौप्य पदक पटकावले होते.
वर्तमानपत्राच्या कागदापासून लगदा तयार करुन, घरगुती उपकरणाच्या सहाय्याने त्याच्या छोट्या विटा बनवायच्या व त्या पाण्यात भिजवून परसबागेतील झाडाच्या मुळावर ठेवल्या की कमीत कमी पाण्यात झाडे जगवता येतात. यात पाण्याची आणि वेळेचीही बचत होते. त्याचप्रमाणे टाकावू कागदाची विल्हेवाटही लावता येते. ऐश्वर्याच्या या प्रोजेक्टला रौप्यपदक मिळाले.
ऐश्वर्याला आय.ए.एस.करायचंय. यासाठी ती सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत असते. तिला संगीत, नृत्याची देखील आवड आहे. या बाल वैज्ञानिक स्पर्धेसाठी तिला केणी मॅडम व आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. कु. ऐश्वर्या हिची आई कणकवलीच्या एस.एम. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षिका असल्याने कणकवलीला राहत असली तरी ती मूळची उभादांडा-वेंगुर्लेची सुकन्या आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दीनानाथ वेर्णेकर यांची ती कन्या होय.

Saturday 12 March, 2011

अंक ९वा, १० मार्च २०११

संपादकीय *

स्त्रीची गरुडझेप हवी!

मै नारी हूँ। नही हारी हूँ। नही हारुँगी ।

असं खंबीरपणे म्हणणा-या स्त्रिया आज २१व्या शतकात कुठेच मागे नाहीत. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीने अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. क्रीडा, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय व्यवसाय एक ना अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया आजही आपला ठसा उमटवत आहेत.

स्त्रियांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली आणि अजून प्रगतीची नवीन दालने तिच्यासाठी खुली होत आहेत. पूर्वीच्या काळी अनन्वित अत्याचार, अन्याय सोसणारी स्त्री, उंब-याच्या बाहेर न पडू पहाणारी स्त्री,सती प्रथा,केशवपन आणि त्याचवेळी होणारे अत्याचार, बालविवाह या सा-यांमधून अगदी शंभर टक्के म्हणता येणार नाही, परंतू ब-याच अंशी बाहेर पडली. सती प्रथा पूर्ण बंद झाली. सावित्रीबाई फुल्यांचा आदर्श असलेल्या स्त्रियांनी अफाट प्रगती केली. सारं जग आज याची साक्ष आहे.

परंतु स्त्री खरंच स्वतंत्र आहे का? स्त्री मुक्ती म्हणजे नेमकं काय? अशा अनेक पैलूंवरती एक स्त्री म्हणून महिलादिनाच्या निमित्ताने मला माझे विचार आवर्जून मांडावेसे वाटतात.

स्त्री मुक्ती किवा स्त्री स्वातंत्र्य हा शब्द मला थोडा विचित्र वाटतो याचं कारण असं की, कुणीच कधीच स्वतंत्र नसतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही परस्परावलंबी आहे. आपापल्या नित्य जबाबदा-या या प्रत्येकालाच पार पाडाव्या लागतात. तसं केल नाही तर समाजव्यवस्था पार कोलमडून जाईल. मग स्वातंत्र्य, मुक्ती म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीने समाजाचा, लोकांचा स्त्रीकडे पहाण्याच्या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे. जबाबदा-यांची देवाण-घेवाण व्हायला हवी.याचं कारण असं, पुरुष आणि स्त्री ही सारखीच कमाई करीत असतील तरी पुरुषांच्या तुलनेत घर-दार, स्वयंपाक, येणं-जाणं, पाहुणे, सगळी नाती, उरलं-सुरलं पहाणं ही सारी कसरत स्त्रीलाच करावी लागते. म्हणूनच अनेक मोठ्या पदांवर असलेल्या महिला,शिकलेल्या महिला म्हणत असतात, ‘कितीही शिकलं ना तरी या कामांना पर्याय नाही हो!

याकरिता ख-या अर्थाने कामाचं शेअरिगव्हायला हवं. घरातल्या पुरुषानेही आपली पत्नी, आपली आई, बहीण जे कुणी असेल त्याला प्रामाणिकपणे मदत करणं, इतर काही जबाबदा-यांमध्ये हातभार लावणं हे जर केलं, थोडा दृष्टिकोन बदलला तर सगळच सुरळीत आणि सुसह्य होईल हे निश्चित!

आपण अनेकदा वाचतो की, ‘चूल आणि मूलयातून स्त्री बाहेर पडली. हे अगदी खरं आहे. परंतू तिच्या जबाबदा-या ती नाकारु शकत नाही. मुळातच केवळ चूल आणि मूलसंभाळणा-या स्त्रियाही कमी नाहीत. सगळ्यांकडे शिक्षण असेलच असं नाही. परंतु परमेश्वरानं कुणाला कला बहाल केलेली असते, कुणाला वक्तृत्व! कुणी पाककलेत प्रविण असतो. केवळ नोकरी केली म्हणून ती मोठी...... हा दृष्टिकोन बदलायला हवा. वीज मंडळाच्या कार्यालयात वीज वाचवा, वीज मिळवा.असं वाक्य वाचायला मिळतं. मग जी स्त्री घरच्या जबाबदा-या उत्तम प्रकारे सांभाळते. जसं असेल त्यात पैसे वाचवून घर चालवते त्या स्त्रीकडे पैसे वाचविणारी, पैसे मिळविणारीअसं का पाहिलं जात नाही? हे घडलं तरच स्त्री मनोमन,आनंदाने,समाधानाने आपलं जीवन ख-या अर्थी जगेल.

केवळ स्त्री मुक्तीचा डंका मिरवण्यापेक्षा खरंच नेमकी गरज कशाची? कोणाला काय समस्या आहेत? हे जाणून घेऊन त्यावर सशक्त उपाय, मदत केली गेली पाहिजे? अनेक वृत्तपत्रातून आपण वाचतो, चॅनल्सवर बघतो, बलात्कार, स्त्री शोषण यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. अशी शिक्षा हवी की पुन्हा कुणाचं तसं पाऊल उचलायचं धाडसच होणार नाही! समस्येतून बाहेर पडण्यासाठी ख-या अर्थी हात दिला पाहिजे. केवळ नारे देऊन काहीच होणार नाही.

तसंच स्त्रीमुक्ती, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे मुलींनी, स्त्रियांनीही लक्षात ठेवलं पाहिजे. मॉडर्न जरुर असावं परंतु त्यातही अंगप्रदर्शनचा बीभत्सपणा नसावा. केवळ करिअरच्या नावाखाली मूल्यांची होणारी पायमल्ली थांबली पाहिजे. समाजामध्ये वावरतांना कसं वागावं? आपली वेशभूषा कशी असावी? आज शहरामध्ये केवळ जबाबदारी नको म्हणून मूल न होऊ देता एकत्र राहिलं जातं. मातृत्व असूनही केवळ फिगर जपण्यासाठी तर, कधी पाश्चात्यांच अंधानुकरण म्हणून सरोगेट मदरसारखे पर्याय जवळ केले जाताना दिसतात. विवाहबाह्य संबंध, बीभत्स अंग प्रदर्शन खरंच या गोष्टी योग्य आहेत का? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. निसर्गाने आपल्या -कडे मातृत्व दिले आहे. एक पिढी घडवणं आपल्या हातात असतं. स्वतः केवळ स्वातंत्र्य या नावाखाली बोन्सायबनून रहाण्यापेक्षा विशाल वटवृक्ष होवून सगळ्यांची छाया बनावं! हाही विचार गरजेचाच आहे! तरच यशाच्या गगनभेदी आयुष्यात ख-या अर्थानं स्त्रीची गरुडझेपसार्थकी लागेल!

अतिथी संपादक

सौ. सुमेधा देसाई

अधोरेखित *

मला आईची आई बनायचंय!

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी

आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. ऽऽ आईऽऽ

खरोखरच आईहा शब्दच असा आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाचं विनाअट संगोपन करत असते. मातृत्वाचं वरदान लाभलेल्या स्त्रियांचा तो एक नैसर्गिक गुणच आहे. परंतु एकाच नाही तर हजारो मुलांची आई असलेल्या माई म्हणजेच सिधुताई आणि स्वतःच्या आईचा सहवास ख-या अर्थान न लभता सुद्धा त्याविषयी न कुरकुरणारी त्यांची कन्या ममता या मायलेकी आजच्या स्त्रियांसाठी आदर्शवतच म्हटल्या पाहिजेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने या माईच्या लेकीचा प्रवास तिच्या भावना, विचार उल्लेखनीय आहेत असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

मी सिधुताई सकपाळ बोलतेयया सिधुताईंचा जीवनपट उलगडून दाखविणा-या चित्रपटामुळे माईघराघरात जाऊन पोचल्या आहेत. हजारो मुलांची आई बनण्यासाठी त्यांना स्वतःचं मातृत्व बाजूला ठेवून, त्याग करुन जगावं लागलं. त्यांची मुलगी ममता प्रत्येक टप्प्यावर जसं जमेल तसं शिक्षण घेत दोन वर्ष या संस्थेत, दोन वर्ष त्या संस्थेत असं करत केवळ वर्षातून एखाद-दोन वेळा आई भेटावी अशा त-हेने तिचं बालपण गेलं. ६वी नंतर पुण्यात शिक्षणासाठी माईंनी तिला ठेवलं. १२ वर्ष होस्टेलला राहून मानसशास्त्रामध्ये बी.ए. व नंतर एम.एस.डब्ल्यू. ममताने पूर्ण केलं. आज ममता माईच्या म्हणजेच आईच्या वाटेवरुन चालत ११० मुले, अनेक वृद्ध माणसे, विधवा, घटस्फोटीत महिला, निराधार, निराश्रीत महिला अशा निराधारांची धुरा सन्मती बालनिकेतनया संस्थेच्या माध्यमातून सांभाळत आहे.

ममताशी दूरध्वनीद्वारेच संफ झाला. चर्चेच्या ओघात ती बोलत गेली. सामान्य मुलांसारखी आपली आई आपल्या वाट्याला आली नाही याचं कधी दुःख वा खंत वाटली नाही. कारण इतर मुलांजवळ आई जशी जवळ असते तशी माझ्याजवळ कधीच नव्हती, त्याखेरीज संस्थेमध्ये वाढणारी इतर मुलंही आईविनाच होती. त्यामुळे कुटुंब हे विश्वच माहित नव्हतं. जेवढी आई भेटायची तेच परमसुख वाटायचं. जे मिळालं त्याव्यतिरीक्त आई मुलीचं नातं काय असतं ते पाहिलंच नव्हतं.आईचा खूप अभिमान, कौतुक वाटत असल्याचं ती सांगते. आपल्या आईविषयी भारावून बोलतांना आईला म्हणजेच सिधुताईंना जेव्हा एवढ्या प्रकाशझोतात ती पहाते त्यावेळी आपण हिचा अंश आहोत यावर स्वतःचाच विश्वास बसत नाही. एवढी मोठी मातालाभणं हे मी परमभाग्य मानते. ज्यावेळी माई थकतात त्यावेळी मला त्या लेकरासारख्या वाटतात. माईंना आंजारावं, न्हाऊ माखू घालावं असं मनोमन वाटतं. आईसाठी काय करावसं वाटतं? असं विचारल्यावर ती पटकन उत्तरते, ‘मला आईची आई व्हायचंय!ममताची ही प्रगल्भता, विचारांची ही उंची तिच्याजवळ आली कशी हे तिलाही उमजत नाही. परंतु आई हेच विश्व, आईची वाटचाल, तिची निर्णयक्षमता, तिचे मनावर नकळत होणारे उत्तम संस्कार, आईच्या दूधातूनच ही प्रगल्भता आल्याचे ती सांगते.

समस्या प्रत्येकाला असतात. प्रत्येक स्त्रिच्या समस्या, तिला उपलब्ध असलेले पर्याय, परिस्थिती यातून मार्ग काढायला मदत केली तर तो खरा प्रयत्न म्हणता येईल. केवळ दिखाऊपणासाठी स्त्री मुक्तीचा पिटला जाणारा डंका, मोर्चे यातून काहीच साध्य होणार नाही. प्रत्यक्ष मदत अनिवार्य असल्याचं ती सांगते.

माई हजारो मुलांच्या आई बनल्या आहेत. आज तरुण पिढीची केवळ करियर या नावाखाली किवा स्त्रीमुक्ती या शब्दाचा विपर्यास करुन मातृत्वनाकारण्याची शहरातील वाढती मानसिकता किवा सरोगेट मदर यावर बोलताना ती सांगते की, आपण जे बघतो, एकतो त्याने माणसाचा दृष्टिकोन तयार होत असतो. आपण डोळे उघडे ठेवून चालले पाहिजे. आपण एखादं काम केले नाही तर तिथे दुसरं कुणीतरी हजर असतं. हा विचार डोक्यात ठेवून वागणं फार महत्वाचं. तरुण पिढीचा बदलता दृष्टिकोन, मुक्तीच्या नावाखाली होणारी मूल्यांची घसरण हे थांबविण्यासाठी निकोप दृष्टिकोन तयार होण्याची आवश्यकता आहे.

सिधुताईंचं परिस्थितीशी टक्कर देवून उभं रहाणं आणि हजारो मुलांची आई होणं हे अफाट आहे. त्यांच्यासारखी आई व्हायला खूप मोठ काळीज आणि त्यागी वृत्ती लागते. आईसारखी आई होणं झेपणारं नाही. परंतु सगळ्यांची माईमी नक्कीच आहे हे त्या आवर्जून सांगतात.

सिधुताईंच्या जीवनावर चित्रीत करण्यात आलेल्या चित्रपटावर बोलताना त्या म्हणतात की आई बरोबर मीच चिमुरडी, तान्ही होते हे मला माहित होतं पण तान्हीला घेवून वाटचाल करताना कसे प्रसंग घडले ते या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद महादेवन यांनी दाखविल्याचं ममता सांगते.

सिधुताई सकपाळांचं जीवन म्हणजे अक्षरशः धगधगते अग्निकुंडच! हजारो मुलांची आई असलेल्या सिधुताई आणि माझ्या वाट्याला आई आली नाही म्हणून अजिबत खंत न बाळगणारी, उलट मला आईची आई बनायचंय!असं म्हणणारी ममता या दोघी मायलेकींना हॅटस् ऑफ द् बोथ!म्हटल्यावाचून रहावत नाही.

-सौ. सुमेधा देसाई, तळेबाजार

महिला विशेष *

जिद्द *

मायादत्त आंबर्डेकर

अपंगत्वावर मात करीत ज्योतिषविद्या, संगीत कला याद्वारे सामाजिक कार्यातही आपला सहभाग देणा-या वेंगुर्ले येथील मायदत्त आंबर्डेकर यांनीही प्रचंड जिद्द, साईबाबांवरची निस्सीम श्रद्धा यांच्या जोरावर समाजात स्वतःच वेगळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या अचूक भविष्यकथनाचा कित्येकांनी अनुभव घेतला आहे.

मायाताईंचे वडील कै. भाऊ आंबर्डेकर हे निस्सीम साईभक्त.तिच परंपरा मायाताई आणि त्यांचे सर्व कुटुंब भक्ती भावाने चालवित आहेत. आपल्या हातून होणार प्रत्येक काम हे साईबाबांच्या कृपेने होत असल्याचे त्या मानतात. स्वरसाधनाया संस्थेतर्फे दर बुधवारी मायाताईंच्या घरी संगीताची मैफल जमते.

भाऊंनी स्वतःरचलेल्या बंदिशी, रागांची माहिती,शास्त्रीय संगीताचा ओनामा ठरेल अशी माहिती भाऊंनी हस्तलिखीत स्वरुपात लिहून ठेवली होती. हा संगीताचा खजिना पुढील पिढीला पुस्तक रुपाने मिळावा ही भाऊंची इच्छा मायताईंच्या प्रेरणेनेच पूर्ण झाली.

किरातच्या ८८व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून किरातप्रकाशनातर्फे भाऊंनी लिहिलेले स्वरमायाहे पुस्तक ख्यातनाम संगीतकार अशोक पत्कींच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आले. तिथली संगीत मैफल, पाहुण्यांना आमंत्रण देणे ही सर्व जबाबदारी मायाताईंनी फोनवरुन हँडल केली. यांच्या कामात त्यांचे बंधू बाळ दोन बहिणी आणि आईचही मोलाचं सहकार्य असत. किरातसाठी मायाताईंनी सुरु केलेल्या रेशीमगाठीया सदरामुळे कित्येक लग्नगाठी जुळून आल्या आहेत.

आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करुन जीवन आनंदी ठेवण्याचा मायाताईंचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

सौ. प्रज्ञा परब

राजकारणात असूनही समाजकारण जपणारी माणसं विरळच असतात. सध्या राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा असलेल्या प्रज्ञा परब यांचा राजकारणा -पेक्षा समाजकारणावर जास्त भर असतो.

१९८८ पासून त्या सहकार क्षेत्रात काम करीत आहेत. फळ प्रक्रिया, कृषीमाल प्रक्रिया आणि पर्यटन यांच्या माध्यमातून विकास साधायचा असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. सहकारी संस्थेच्या माध्यमातून कँम्प-वेंगुर्ला येथे सुरु असलेला काथ्या कारखाना हे रोजगार निर्मितीचे प्रत्यक्ष उदाहरण म्हटले पाहिजे. कोकणातील नारळाची सोडणे ह्या टाकाऊ वस्तूपासून हा काथ्या बनत असल्याने प्रत्यक्ष ४० आणि बचत गटाच्या माध्यमातून सुमारे २०० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या प्रमाणात अर्थसहाय्य करता यावा याकरिता त्यांनी क्रांती ज्योत सावित्रीबाई फुलेंच्या नावाने महिला सहकारी पतसंस्था स्थापन केली आहे. वेतोरे येथे सूर्यकांता फळ प्रक्रिया उद्योग सहकारी तत्त्वावर सुरु करुन त्या भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिलाय. अलिकडेच एम.के.सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती झाली असून कोकणातील प्रमुख फळपीक काजूची युनिट स्थापन करुन सहकारामध्ये यशस्वी झेप घेतली आहे. संस्थेने ४ कोटीचा विकास आराखडा तयार केला असून ८ लाखाचे ५०० टन क्षमतेचे गोडावून, ३० लाखाचे पॅकींग व ग्रेडींग युनिट बांधण्यात येणार आहे. आतापर्यंत १२० महिलांचे क र्ज प्रस्ताव केले असून त्यांना उद्योग मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये पती प्रदिप आणि कुटुंबियांचा पाठिबा तसेच उद्योगमंत्री नारायण राणे, काँग्रेस नेते एम.के.गावडे यांचे मार्गदर्शन असल्याचा आवर्जून उल्लेख करतात. जिद्दीने प्रत्येक पाऊल पुढे टाकणा-या प्रज्ञाताईंच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा!

सौ. शुभदा शेणई

पूर्वाश्रमीच्या रजनी नारायण प्रभु शिरोडकर. लग्नानंतर सौ. शुभदा अविनाश शेणई. पहिल्यापासून समाजसेवेची आवड. पूर्वी वेंगुर्ल्यामध्ये पवार बाई संचलित बालवाडी होती. नंतर ती बंद पडल्याने १९८६ साली सौ. शेणई यांनी स्वतः बालवाडी सुरु केली. या बालवाडीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपर्यंत कित्येक मुलांना त्यांनी अल्प मोबदल्यात शिकविले. या बालवाडीत शिकलेली मुलं आज डॉक्टर, वकील, इंजिनिअर, उद्योग, राजकीय, शासकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. बालवाडीत शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमाची आवड निर्माण केली जाते. वर्षातून एकदा स्नेहसंमेलन घेऊन बालवाडीतील प्रत्येक मुलाला त्यामध्ये सहभागी केले जाते. लहानपणापासून मुलांना स्टेज डेअरींगमिळावं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो.

संचालकांनी मुलांना खेळण्यासाठी लाकडी खेळणीही उपलब्ध करुन दिली आहेत. मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचे वाढदिवस तसेच रंगपंचमी, गोकुळाष्टमी असे सणही साजरे केले जातात. मुलांना उपयुक्त असे उपक्रम राबविले जातात. आता तर या बालवाडीमध्ये मराठी बरोबरच इंग्रजीचेही ज्ञान दिले जाते.

सौ. शेणई यांनी शिक्षण क्षेत्रा बरोबरच ११ वर्षे वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगरसेविका म्हणून काम केले आहे. सरकारचे कोणतेही अनुदान न घेता अल्प मोबदल्यात २५ वर्षे छोट्या मुलांना अविरत ज्ञान देण्याचे कार्य त्या करत आहेत. त्यांच्याकडून असेच चांगले कार्य घडो ही सदिच्छा!

शब्दांकन - अॅड. शशांक मराठे, प्रथमेश गुरव

सुंदरा मनामध्ये भरली!

सुंदरा मनामध्ये भरलीही शाहिर पठ्ठे बापूरावांची लावणी ऐकली की अभिजात भारतीय सौंदर्याच्या श्रेष्ठतेबद्दल खूणगाठ पटल्याशिवाय रहात नाही. अनादी काळापासून भारतातल्या निरनिराळ्या प्रदेशातले अस्सल स्त्री सौंदर्य हे जगद्विख्यात आहे. आपल्या इतिहासातही आपल्याला स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या स्त्रियांच्या आख्यायिका ऐकायला, वाचायला मिळतात. सीता, दौपदी, शकुंतला, देवयानी यांसारख्या रुपवान स्त्रियांमुळे रामायण, महाभारतासारखी खंडकाव्य रचली गेली आणि हाच इतिहास संस्कृती म्हणून आज आपण जगभरात अभिमानाने मिरवत आहोत. अशा रुपवान, बुद्धीवान आणि कर्तव्यपरायण स्त्रियांची परंपरा भारतात आजही जरासुद्धा खंडीत झालेली नाही. उलटपक्षी आज भारतीय स्त्रिया सौंदर्य, कला, उद्योग, क्रिडा अशा प्रत्येक आघाडीवर जगातील इतर देशांतल्या स्त्रियांपेक्षा कणभर सरसच ठरत आहेत याबद्दल आपण अभिमान बाळगायला हवा.

भारतात जेव्हा इंग्रजांची राजवट, आधुनिकता, सिव्हिलायझेशन अशा शब्दांशी कोणी परिचितही नव्हतं तेव्हा भारतीय सौंदर्याच्या व्याखेत केवळ शारिरीक आकर्षकपणा कुठेच बसत नव्हता. स्त्रिचं आरोग्य, तिचा खानदानीपणा, वर्तणूक, वाणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिची बुद्धी आणि लज्जा हे सौंदर्याचे प्रमुख निकष समजले जायचे. सलज्ज सात्विक स्त्री ही उत्तम सौंदर्यवती मानली जायची. समाजातल्या प्रतिष्ठीत, अब्रुदार वर्गाव्यतिरीक्त चारीत्र्य, शील या परिमाणात कमी समजल्या जाणा-या वर्गामध्ये सुद्धा हे अस्सल सौंदर्य त्यावेळी पहायला मिळे. मोठमोठ्या राजांच्या, जमिनदारांच्या नायकीणी, कोठ्यावरच्या नाचणारणी, कोकणातल्या देवाच्या भावीणी, तमाशातल्या कलावंतीणी, यलम्मा देवीच्या जोगतीणी अशा चारित्र्यहिन समजल्या जाणा-या स्त्रिया सुद्धा अशा सलज्ज अभिजात आणि पडदानशिन सौंदर्याच्या मालकीणी असत. त्यांच्याकडे साहित्य, प्रतिभा, कला आणि मधुरवाणीचा न संपणारा खजिना असे. त्यांच्या नृत्य, गायन, काव्य, संगीतवादन, अभिनय, निवेदन अशा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वांवर व दर्जेदार कलेवरच त्यावेळचे कला, बुद्धी आणि मनाच्या सौंदर्याचे उपासक असणारे राजेरजवाडे त्यांच्याकडे ओढले जात असत. महाराष्ट्रापुरते म्हणायचे झाले तर तमाशा किवा लावणी ही आपली जुनी लोककला. सौंदर्य, बुद्धी आणि कला यांचा त्रिवेणीसंगम म्हणजे आपली लावणी. त्यावेळच्या लावणी कलावंत या अतिशय प्रतिभावान असत. समाजासाठी तमाशा हा विरंगुळ्याचे साधन असला तरी जातीवंत लावणी कलावंतीणी कधीही कोणाला स्वतःशी शारीरीक सलगी करण्याची परवानगी देत नसत. शरीरविक्रय करुन पोट भरणे हा तमाशाचा हेतू कधीही नव्हता. केवळ अशा कलावंतीणींच्या नृत्य, गायन आणि अदा या प्रतिभेला आणि सौंदर्याला लोक भुलत असत. त्यासाठी तिला शरीराचा इंचभर भाग सुद्धा उघडा करुन दाखवण्याची वा शरीरविक्रयासारख्या निर्लज्ज प्रकाराची गरज पडली नाही.

आजच्या काळातले डान्सबार, सवंग अभिरुचीहिन नृत्ये, चित्रपटांतील घसरलेले चारित्र्याचे चित्रण, शरीर विक्रयाची उघडी निर्लज्ज दुकाने मात्र काही वेगळेच सांगत आहेत. अभिजात कलेचा लवलेशही नसलेले असंख्य प्रकार आज कलेच्या नावावर खपवले जातात. कलेचे पुनरुज्जीवन अशा गोंडस नावाखाली लावणीसारख्या प्रकारातला सवंगपणा वाढत चालला आहे. जातिवंत नायकीणींची जागा प्रतिभाहीन निर्लज्ज डान्सबार कलाकारांनी घेतली आहे. सौंदर्याचे उपासक स्त्रिच्या उघड्या शरीराचे प्रदर्शन मांडणा-या सौंदर्य स्पर्धा घेऊ लागले. स्त्री शरीर, तिची कमनियता, तिच्या त्वचेचा पोत, रंग, तिचे चालणे, बोलणे यावर तिचे सौंदर्य ठरवले जाऊ लागले. लज्जा संपली. अभिजातपणा लोप पावला. प्रतिभेला तिलांजली मिळाली. समाजाच्या सर्व थरांत दिसणारे भारतीय स्त्री सौंदर्य निराळ्याच अभिरुचीहिन स्वरुपात जगासमोर यायला लागले. जिथे तिथे स्त्रिचे उघडे शरीरहीच माध्यमांची प्रमुख मागणी ठरली. असे का घडले? अभिजात भारतीय कला आणि सौंदर्याचा एकमेवाद्वितीय संगम कुठे लोप पावला? भारतीय समाजाची दर्जेदार दृष्टी कशी अंध झाली? याचा गंभीरपणे विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतात स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिकतेचे वारे वाहू लागले. त्याही आधी इंग्रजांच्या राजवटीत भारतीय समाजातील थोडेबहुत शिकलेले लोक, त्यांच्या दरबारी नोकरीला असलेला वर्ग हा आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा विसरुन पाश्चात्य देशांच्या राहणीमानाने, शिष्टाचाराने प्रभावित होऊ लागले. त्यांच्या सानिध्यात, वर्चस्वाखाली राहून त्यांच्या स्वतंत्र, स्वैर विचारांचे पुरस्कर्ते होऊ लागले आणि तिथेच आपल्या समाजाची परंपरागत चालत आलेली अभिरुची बदलली. इंग्रजांच्या आधीही आपल्याकडे शिक्षण होते. परंतु या शिक्षणाने कधीही आपल्याला स्वैर बनवले नव्हते. आता फरक तोच पडला. त्यांच्या आधुनिक विचारसरणीने प्रभावित होऊन आपल्या तरुण पिढीचा स्वैर स्वातंत्र्याकडे ओढा वाढला. आधुनिकतेमधल्या प्रगतीचा अंगिकार करण्यात गैर काहीच नाही. परंतु चांगलं असो वा वाईट असो केवळ आधुनिक म्हणून स्विकारणं आणि तेही स्वतःच्या दर्जेदार संस्कृतीला चूड लावून परकीयांचे अंधानुकरण करणं हे तर दरिद्रीपणाचे डोहाळे आहेत. नेमका हाच फरक समजण्याची कुवत वा तयारी आपल्या तरुण पिढीची नाहीशी झाली आणि आपण आपले स्वतःचे असे जातिवंत सौंदर्य गमावून बसलो. मूर्खपणाचा कळस म्हणजे आधुनिक म्हणवणा-या भारतीय स्त्रिया स्वतःच स्वतःच्या लज्जेची लक्तरं वेशीवर टांगू लागल्या. साडी किवा सलवारकमीज अशा पोशाखांऐवजी ज्यात अंगोपांग उठून दिसते असे स्लॅक्स, वनपीस, टॉप्स घालण्यात आपल्या मुली धन्यता मानू लागल्या. जेवढ्या मुली जास्त आधुनिक होत गेल्या तेवढे लैंगिक गुन्हे वाढू लागले. आपल्या मर्यादा विसरुन स्त्रिया पुरुषांशी बरोबरी करण्याच्या नादात मद्यपान, धुम्रपान, शारिरीक सलगी इ. गोष्टींची सुद्धा मानसिक तयारी दाखवू लागल्या. स्त्री आता अबला राहिली नाही यात काही वादच नाही आणि स्त्रिला कमी दर्जा देणा-या समाजाची दृष्टी बदलण्यातही आजची भारतीय स्त्री यशस्वी झालेली आहे हा आधुनिकतेचा एक चांगलाच भाग आहे. आजच्या स्त्रिला नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडावेच लागते. तिच्या स्वतःच्या आणि एकूणच स्त्रिच्या प्रगतीसाठी हे आवश्यक आहे हेही मान्य. परंतु केवळ स्त्री ही पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही हे दाखवून देण्यासाठी वाईट घातक सवयी सुद्धा आत्मसात करणे म्हणजे मात्र प्रगतीचा विपर्यास आणि आधुनिकतेच्या हट्टापायी केलेला अविचार ठरतो असे मला वाटते. स्त्री आज जरी आधुनिक झालेली असली तरी तिचा शरीरधर्म बदललेला नाही. तसेच स्त्री सोबत सर्व समाजच आधुनिक होत चालल्याने स्त्रीकडे लैंगीक स्वैराचाराच्याच दृष्टीने पहाण्याची समाजाची सुद्धा मानसिकता वाढली. पाश्चात्य देशांमध्ये लैंगीक स्वैराचार खूप आधीपासूनच समाजमान्य आहे. केवळ याच कारणास्तव आज अनेक पाश्चात्य देशांतल्या तरुण पिढ्या सर्वनाशाच्या दरीत फेकल्या गेल्या आहेत आणि त्या देशांचे भवितव्य अक्षरशः संपुष्टात आलेले आहे. आपले तसे नाही. आपल्याला तारणारी आणि पुन्हा उभं करणारी आपली महान संस्कृती आहे. आज भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठपणाची ओळख अनेक परकीयांना पटून आपल्या संस्कृतीचे कित्येक पाश्चात्य लोक अनुकरण करत आहेत. भारतीय मनुष्याला प्रगतीच्या शिखरावर यथोचित बसवणारी ही आधुनिक प्रगती नाही तर भारतीय संस्कृतीच आहे हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. जितका आधुनिकतेमधल्या उत्तानपणाचा पुरस्कार आपण करु तितकी आपल्याकडे पहाण्याची समाजाची दृष्टी खालावत जाणार आणि त्याचा त्रास गुन्हे, शोषण या स्वरुपात स्त्रीलाच सर्वाधिक होणार आणि त्याची कडू फळेही स्त्रिलाच भोगायला लागणार हा निसर्गनियम आहे. अन्यायी वाटला तरी तो स्त्री शरीराचा नैसर्गिक धर्म आहे आणि कोणी कितीही आधुनिक झाले तरी हा धर्म बदलण्याची ताकद कोणामध्ये कधी निर्माण होणे शक्य नाही आणि हा निसर्गनियम बदलूही नये. कारण याच नियमाची भारतीय संस्कृती मुल्यातील सुवर्णसंधी म्हणजे स्त्रिला सौभाग्य आणि आदर बहाल करणारे विवाह बंधन व मातृत्व होय.

आधुनिकतेच्या पाश्चात्य उत्तानपणाला बळी पडलो नाही तरच आपण खरी भारतीय स्त्री ठरणार आहोत आणि निसर्गाने स्त्रिला बहाल केलेली सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजेच मातृत्वाचा आस्वाद आपण मुक्तपणे चाखू शकणार आहोत. लैंगिक स्वैराचार, विवाहबाह्य संबंध, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, कुमारी मातृत्व अशा लैंगिक संबंधांमध्ये हल्लीच्या तरुणींना काहीच गैर वाटत नाही. परंतु अशा मानसिकतेमध्येच विनाशाचे पहिले पाऊल पडलेले आहे हे या तरुणींनी लक्षात घ्यायला हवे. अशा प्रत्येक संबंधात शारिरीक आणि मानसिक ताप केवळ स्त्रिलाच भोगावा लागतो. स्त्री-पुरुष समानतेच्या आपण कितीही पुरस्कर्त्या असलो तरी निसर्गानेच जर स्त्री आणि पुरुषाच्या शरीर रचनेत काही फरक केलेला आहे, तर आपण तोही नाकारुन आधुनिकतेच्या नावाखाली स्वतःच्याच पायावर दगड मारुन घेण्यात काय अर्थ आहे? आपल्या संस्कृतीने विवाह बंधनाच्या रुपात सहजीवनाचा, मातृत्वाचा आणि वृद्धापकाळातील एकटेपणावर रामबाण उपाय म्हणून एक अतिशय समंजस मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. आपल्यासाठी योग्य ठरणारा जोडीदार निवडणं हे कधीही आपल्या हातात असतं आणि ते कसब साधलं तर आयुष्य खरोखर नंदनवन होऊन जातं. हे कसब समजा साधलं नाही आणि जोडिदाराचा निर्णय चुकला तर आयुष्यभर फरफट होऊ नये म्हणून विवाह बंधनच निरुपयोगी ठरवणे हे मात्र आयुष्यभराच्या नैराश्याला, एकटेपणाला आणि मानसिक कुचंबणेला आमंत्रण देण्यासारखं आहे.

सौंदर्य स्पर्धा म्हणजे केवळ स्त्रीच्या अंगप्रत्यांगाचे प्रदर्शन हा समज डोक्यातून काढून टाकून आपल्या संस्कृतीला अनुसरुन बुद्धी, आरोग्य, चारीत्र्य, व्यवहार कुशलता, कर्तव्य अशा निकषांवर जर भारतीय स्त्रीचे परीक्षण केले गेले तर पूर्णवस्त्रांकीत सलज्ज अभिजात सौंदर्य लाभलेली भारतीय स्त्री ही जगात सर्वोत्तम ठरेल यात शंका नाही आणि हे सौंदर्य चिरकाल टिकणारे आणि सदाबहार तेजस्वी सुद्धा असेल. असे न झाल्यास मात्र स्त्री सशक्तीकरणाच्या वल्गना केवळ वल्गनाच रहातील. प्रत्यक्षात मात्र स्त्रियांवरचे अत्याचार वाढतच जातील.

- डॉ.सौ. नम्रता रा. बोरकर

कोण आहे समाजाची नियंत्रक शक्ती?

मुलगी शिकली प्रगती झालीअसं वाक्य रिक्षाच्या मागे वाचलं व आपल्या भारतीयांच्या प्रगतीच्या संकल्पनेचा आवाका आला आणि मग खेडेगावातल्या रुग्णालयात काम करतांना जे प्रसंग अनुभवले ते सहज नजरेसमोर तरळले.

एक ३२ वर्षीय स्त्री गरोदरपणातील गुंतागुंतीमुळे दापोली म्हणजे आमच्या रुग्णालयापासून १०० कि. मी. दूर इथून अत्यवस्थ अवस्थेत रात्री ११ वाजता दाखल झाली. तिला सतत फिटस् येत होत्या. ती पूर्ण बेशुद्ध होती. आम्ही तिला त्वरित सिटी स्कॅन करुन उपचाराकरिता कृत्रिम श्वास चालू केला. अतिरक्तदाब वाढून तिच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.

तिला आणखी दोन लहान मुलं होती. तिची आई व ती लहान मुलं अतिदक्षता विभागाच्या बाहेर आपली आई बरी होईल, बाहेर येईल म्हणून आसं लाऊन बसली होती. नव्याने जन्मलेल्या बाळाला आम्ही अतिदक्षता विभागात घेऊन तिला बरं करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. तिचा नवरा गळ्यात जाड सोन्याची चेन, जाडजूड व्यक्तिमत्व असा अधून मधून तिची चौकशी करायला यायचा.

आमच्या प्रयत्नांना यश आलं. ती शुद्धीत आली. सर्वांना ओळखू लागली. फिजिओथेरपी सुरु झाली व घरी जाण्याची वेळ जवळ आली. तिच्या मुलांकडे पाहून रुग्णालयाने सर्व खर्च केला व डिसचार्ज देताना नव-याला बिलाचा आकडा सांगितला.

बिल बघितल्यावर नव-याने क्षणाचाही विलंब न करता उद्गार काढले की, ‘एवढे बिल भरण्यापेक्षा मी घरी जाऊन दुसरे लग्न करतो, तुम्ही तिला इथेच ठेवा.हे वाक्य ऐकल्यावर आम्ही अवाक झालो व आमच्याच अॅम्बुलन्सने तिला दापोलीला नव-याकडे सोडले. तिच्याकडे व मुलांकडे बघून तिचे सर्व बिल माफ केले. पण प्रश्न फक्त बिल माफ करण्याचा नव्हता तर आपल्या समाजात स्त्रीचे स्थान काय आहे? ह्याची जाणीव करुन देण्याचा होता!

एकदा अशीच २२ वर्षीय युवती रात्री तिच्या आईच्या छातीत दुखते म्हणून तिला रुग्णालयात घेऊन आली होती. आईला हार्ट अॅटॅक आहे व अॅडमिट करावे लागले असे सांगितले. आई तशी अॅडमिशनला नाखुषच होती. कारण, मुलीचे वडिल ६ महिन्यांपूवीच वारले होते. घरात २ भावंडे व घरचा सर्व भार या मुलीवर. ती एका बँकेत नुकतीच नोकरीला लागलेली होती व घर चालवत होती.

आईच्या डिसचार्जचा दिवस जवळ आला मी माझ्या केबीनमध्ये पेशंट तपासत होते. तेवढ्यात आमच्या नवजात अर्भक विभागात अॅडमिट असलेल्या तिळ्या मुलींचे वडील आत आले व ही मुलगीही बरोबर आली. या माणसाला आधीच्या ३ मुली होत्या व मुलगा हवा या हव्यासापोटी हा एक शेवटचा चान्स घेतला होता व ३ कमी वजनाच्या मुली देवाने पदरात टाकल्या तेव्हा आता हे बिल मी कसे भरु असे त्याचे म्हणणे होते! मी त्या मुलीला म्हटलं, ‘अगं, तू या माणसाबरोबर आत का आलीस?‘ तर ती म्हणाली की, हे माझे होणारे दीर आहेत व जेव्हा माझ्या आईला कळलं की, मी ज्या घरात लग्न होऊन जाणार तिथे तिळ्या मुली झाल्या तेव्हा तिला हार्ट अॅटॅक आला. दोन कुटुंबांची आगीतून उठून फुफाट्यात अशी परिस्थिती साधारणपणे उद्भवते याची जाणीव झाली.

सकाळी ११ वाजता पेशंट बरोबर पेशटंचे बिल तपासण्याचे काम चालू होते. काम खरं तर कंटाळवाणं, पण इतके सामाजिक प्रश्न ऐकण्याची व सोडविण्याची संधी मिळाली की, खरं तर डॉक्टर असण्याचं महत्त्व कळलं. नुसत्या शरिरावर उपचार न करता त्या रुग्णाच्या अख्या कुटुंबाला जाणून घेण्याची,त्यांच्या जीवनात डोकावून तिथल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव करुन घेण्याची जणू काही सवयच लागली आणि त्याचा फायदा असा झाला की,लोक जास्त जवळ आले. आपलेसे वाटू लागले व एक आपुलकीचं वेगळच नातं निर्माण झालं.

दुपारचे ११ वाजतच होते. इतक्यात एक ६० वर्षाची वृद्ध आजी केबीनमध्ये आली. चेह-यावर भिती, शरीर कंप पावत होते. मी विचारपूस सुरु केली. काय झालं? तशी आजी म्हणाली, माझे ४ पेशंट अॅडमिट आहेत. सर्वांच मिळून जे बिल झालं आहे ते मी भरु शकत नाही. मी रागातच सुरुवात केली. अहो, सर्व पेशंट फार गंभीर अवस्थेत होते. सर्वांची शस्त्रक्रिया करावी लागली. सर्वांना अतिदक्षता विभागात ठेऊन मोडलेली हाडं जोडावी लागली. आर्थिक प्रश्न बाजूला ठेऊन आम्ही त्यांना बरं केल आहे आणि आता तुम्हाला खर्चाचा अंदाज दिला आहे. असं कुठेच होत नाही.

ती स्त्री म्हणाली, त्याबद्दल मी रुग्णालयाची आभारी आहे. ही चार मुलं माझीच नातवंड आहेत. मी लातूरला रहाते. पण माझं माहेर कोकणात. सुट्टीसाठी मी त्यांना माझ्या माहेरी घेऊन आले पण माझच दुर्दैव. आमच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने त्यांचे इथे उपचार झाले. मी घाबरत घाबरतच लातूरला फोन केला. मुलं बरी आहेत. आम्हाला न्यायला या. तिकडून उत्तर आलं. तू तुझ्या माहेरी त्यांना नेलस तेव्हा त्यांना बरं करुन बिल भरण्याची जबाबदारी तुझीच आहे. आम्ही येऊ शकत नाही. मी माझ्या सासरी कधीच कोणालाही दुजाभाव केला नाही. सासरकडच्यांना आई, वडिल, भावा-बहिणींप्रमाणेच वागवले. पण हे उत्तर मिळाल्यावर पायाखालची वाळूच सरकली. अहो, ४० वर्षे संसार करुन नव-याच्या घरची होऊनही सासर माहेर एकरुप होऊ शकत नाही. एवढा परकेपणा स्वतःच्या घरात!

मला एकंदर परिस्थितीची कल्पना आली. त्या आजीला म्हटलं तुला जेवढे पैसे भरणे शक्य आहे तेवढे भर व मुलांना घरी घेऊन जा. विषय संपला. पण मुलगी सासरी गेली तरी शेवटपर्यंत परकीच ही बोचणी मनाला सतत लागूनच राहिली.

वालावलकर रुग्णालय स्त्रियांना समाजाचा केंद्रबिदू मानून त्यांच्याकरता अनेक कार्यक्रम राबविते. पण हे सामाजिक प्रश्न कसे सोडवायचे? एक डॉक्टर म्हणून शरीरावर फक्त उपचार करायचे पण मनाचं, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं काय? म्हणून किशोर वयात मुलींना पोषक आहार वाटप, गरोदर स्त्रियांना लाडू, औषधं वाटप करणे, त्यांचे डोहाळजेवण, मंगळागौरी करुन समाजात त्यांना असलेल्या महत्त्वपूर्ण स्थानाची जाणीव करुन देणे असे उपक्रम आम्ही सुरु केले.

तरीही म्हणतात ना, स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे. त्याप्रमाणे खेडेगांवातील गरोदर स्त्रीला चांगल्या सुविधांपासून वंचित ठेवणं हे काम स्त्रिया चांगलं करु शकतात. मुलगी झाली तर हिणवण या गोष्टी करायला इतर स्त्रिया विसरत नाहीत. सासू म्हणते, आमची दहा, दहा बाळंतपण घरी झाली हिलाच मोठ्या हॉस्पिटलचे डोहाळे लागले आहेत. औषधे घेऊन पिड पोसतात आणि मग ऑपरेशन लागेल असे सांगतात. आमच्यावेळी तसं नव्हतं. हीच सासू, जी आपल्या मुंबईला असणा-या मुलाशी भ्रमणध्वनीवरुन संफ ठेवते. गाऊन घालून आपल्या मुलीला शेतात काम करायची परवानगी देते पण बाळंतपण मात्र घरी. तेव्हा ते नविन तंत्रज्ञान वाईट, चुकीचे, मग जन्मलेल्या मुलाला काहीही त्रास झाला की, पोटावर डाग द्यायला मांत्रिकाकडे न्यायलासुद्धा मागे पुढे पहात नाहीत. म्हणूनच वालावलकर रुग्णालयाची टीमआजूबाजूच्या ६० आंगणवाड्यात जाऊन तेथे गरोदर स्त्रियांची नांव नोंदणी करते. त्यांची आठवड्याला तपासणी करुन योग्य तपासणीसाठी रुग्णालयात आणण्याची व्यवस्था करते. पहिली प्रसुती मोफत व सिझेरियन अल्पदरांत अशी सुविधा देऊन प्रसुतीनंतर बाळंतविडा घेऊनच आई व बाळाची पाठवणी केली जाते. सासू, सुनांचे एकत्र मेळावे घेऊन रुग्णालयातील प्रसुतीचे महत्त्व पटवून दिले जाते.

लग्न ठरतांना १० माणसं एकत्र येतात, चर्चा होते, मुहूर्त ठरतो, खरेदीची दुकानेही ठरतात, बजेट ठरतं.. पण प्रसुती मात्र कोठेही. उंबरठ्यावर, रिक्षात, रस्त्यावर, अॅम्ब्युलन्समध्ये. असे का? बाळ जगात येणार तो पहिला श्वास असा कुठेही का म्हणून घेणार? म्हणून माहेरयोजनेंतर्गत रुग्णालयातच शेवटचा आठवडा येऊन रहा असे ह्या स्त्रियांना सांगितले जाते.

पण एवढे करुनही मुलगी झाली तर! भिती आहे. अहो या वेळी मुलगी झाली तर मला घरातच घेणार नाहीत. मला वाटलं. सुरेखा हे वाक्य गंमतीनेच म्हणते आहे. सुरेखाचे ९ महिने भरले होते. तिला आधीची ३ वर्षांची मुलगी होती आणि कळा सुरु झाल्या, प्रसूती विनासायास झाली. बाळ फार गोड होतं. वजनही उत्तम! पण मुलगी! ५ दिवस झाले तिच्या घरचे कोणीही फिरकले नव्हते. सुरेखाचा अंदाज खरा ठरला होता. माझ्या सासूबाईंना ४ मुलगे. त्यामुळे घरातून निघतानाच त्यांनी मला धमकी दिली होती. नवरा एका केमिकल कंपनीत नोकरीला. मग आम्हीच अॅम्ब्युलन्स केली व सुरेखाला व तिच्या मुलीला घरी नेऊन सोडले. त्यानंतर काय झाले कळले नाही.

एक दिवस अपघात विभागात एक ६ महिन्यांची मुलगी कॉटवरुन पडून मेंदूला मार लागल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आली होती. तिची आई फार घाबरलेल्या अवस्थेत होती. मुलीला ब्रेन हॅमरेज झाले होते. मी धावतच तिकडे गेले. आईचा चेहरा ओळखीचा वाटला. मी सुरेखा! तुम्ही मला अॅम्ब्युलन्स करुन घरी सोडलत. संपूर्ण केस माझ्या पूर्णपणे लक्षात आली. अगं पण तू मुलीकडे लक्ष दिलं नाहीस अशी कशी पडली ती? माझा प्रश्न ऐकताच ती रडायला लागली. अहो, घरची सगळी काम मीच करायची, मी करतेच, पण त्या वेळेत माझ्या मुलींना कोणीही सांभाळत नाहीत. तिच्या वडिलांनी तर तिच्याकडे जन्मल्यापासून ढुंकूनही पाहिलेले नाही. ते पेपर वाचत बाहेर बसले होते. मुलगी खेळतां खेळतां पडली. पण तरीही ह्या माणसाने साधे लक्षसुद्धा दिले नाही. तसाच पेपर वाचत राहिला. शेवटी मीच तिला ह्या अवस्थेत उचलून लगेच इकडे आणले.

मनात विचार आला राक्षस ह्याहून काही वेगळा असतो का? बी.एस.सी.होऊन केमिकल कंपनीत नोकरी करणारा हा बागुलबुवा माणूस, माणूस तरी म्हणायच्या लायकीचा आहे का? एवढ्या शिक्षणानंतर हे तरी नक्कीच कळलं असेल की, स्त्रियांमध्ये न्न् गुणसूत्र असते व पुरुषांमध्ये न्न्र् गुणसूत्र असतात. तेव्हा मुलगा होणं हे सर्वस्वी पुरुषांवरच अवलंबून आहे. आपण मर्सिडजचं कव्हर असलेल्या गाडीत बसल्याचा दिखावा करतो. पण प्रत्यक्षात अजूनही आपण बैलगाडीतच आहोत. घरोघरी अन्न, वस्त्र, निवारा, दूरदर्शन व भ्रमणध्वनी ह्या प्राथमिक गरजा भागविल्या गेल्या. जमेल तसं पुस्तकी शिक्षण मिळू लागलं. पण त्याचा जीवनात फायदा किती? शून्य.

दुपारची वेळ होती, पेशंटची गर्दी संपत आली होती आणि एक चाळीशीची बाई माझ्या कक्षात येऊन बसली. हातात ४-५ सोनचाफ्याची फुलं! मला ओळखलत? मी शुभांगी.

मी नेहमीप्रमाणे काय त्रास होत आहे? असे विचारले तेव्हा ती मला म्हणाली, अहो त्रास नाही. तुम्ही मला ओळखलं नाहीत. मी तुमच्याकडे बेशुद्धावस्थेत ६ महिन्यांपूर्वी अॅडमिट होते. श्वास पूर्ण थांबला होता. शुद्ध हरपली होती. जिवंत असण्याचे एकच लक्षण म्हणजे नाडीचे ठोके लागत होते. मला एकदम केस आठवली. आम्ही तिचे निदान सर्पदंश असे केले होते. तिला आठ दिवस कृत्रिमरित्या श्वास द्यावा लागला होता. शिवाय सर्पदंशमारक इंजेक्शन्स द्यावी लागली होती. पण ८ दिवसांनी ती पूर्णपणे शुद्धीत आली होती. आज ती तब्बल ६ महिन्यांनी मला भेटली. तिच्या डोळ्यात भाव दाटून आले होते. अहो, ह्या हॉस्पिटलमुळे माझ्या मुलांना आई मिळाली म्हणून आभार मानायला आले.

खरच! स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! जर ही स्त्री नसती तर ३ मुलं वा-यावरच आली असती. कदाचित नव-याने दुसरे लग्न केले असते. नव-याला बायको मिळाली असती. पण मुलांना आई नाही आणि म्हणूनच वाटतं समाज प्रगतीपथावर जायचा असेल, पुढची पिढी मनाने व शरिराने सक्षम व्हायची असेल तर प्रत्येक घरात एक आई ही हवीच! जिला सध्या गृहिणी (हाऊसवाईफ) अस म्हणतो. पुढच्या कित्येक पिढ्यांची दिशा तीच ठरवित असते.

ह्या अशा स्त्रियांना पुढे आणण्यासाठी त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही सतत वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. त्यांना आपली संस्कृती कळावी यासाठी विशेष प्रयत्न असतात. पण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. तो खेड्यांचा देश आहे. भारतातील ७० टक्के जनता ही खेडोपाडी रहाते असे आपण वाचतो. पण प्रत्यक्षात मिडियामध्ये दाखविलेल्या किवा चर्चा होणा-या गोष्टी ह्या शहरी झकपक आयुष्यातील असतात. खेड्यातील गरिबांपर्यंत हे काहीही पोचलेले नसते. आपण रॅम्पवरुन कॅटवॉक करणा-या स्त्रिया, खेळाडू स्त्रिया, सिनेमातील नट-नट्या यांची प्रगती पाहून स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख आखतो. शहरी स्त्रियांची परिस्थितीसुद्धा ह्याहून काही वेगळी नाही. जीन्स व टी शर्ट घातले,मेक अप केला म्हणून कांही विचारसरणी बदलत नाही.

आम्ही स्त्रियांचे सबलीकरण व्हावे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात म्हणून बचत गट तयार केले. त्यात शहरातील उच्चभ्रू स्त्रियाही पुढे आल्या. मला फार आनंद झाला. म्हटलं, एक दिवस ह्यांच्या बचत गटाला भेट द्यावी. गटातील सर्व स्त्रिया मोठमोठ्या बायका. गडगंज श्रीमंत. पण गरजेपुरतं शिक्षण घेतलेल्या व गृहिणी होत्या. प्रत्येकजण आपआपल्या परीने खाण्याचे पदार्थ, शोभेच्या वस्तू करुन विकत होत्या. मी म्हटलं, अगं तुम्हाला काय गरज आहे, असं करुन पैसे कमावण्याची. उत्तर ऐकून मी अवाक झाले. अहो, माझा मुलगा आता कॉलेजला जातो. पण माझं काही ऐकत नाही. तो फक्त पप्पांचचं ऐकतो. कारण, ते त्याला पॉकेट मनीदेतात. मी कांही कमवत नाही म्हणून मला तो विचारत नाही.

आता मी पण त्याला पॉकेट मनी देऊ शकते. त्यामुळे मलाही घरात थोडं वजन आलं आहे. म्हणजे सर्व कांही मनी ओरिएन्टेडच‘. अगदी नाती सुद्धा! आई म्हणजे जन्मदात्री, मुलांवर संस्कार करणारी, कुंभार मडकी घडवतो तशी मुलांना घडविणारी, गोष्टी सांगणारी, घरातील निर्णय ठामपणे घेणारी, घराची स्वामिनी, आईच्या आदेशाशिवाय घरची काडी सुद्धा इकडून तिकडे होणार नाही. पण ह्याच आयांना एका कार्यशाळेत आम्ही प्रश्न विचारला. अभिमन्यू कोण होता? तर एका मुस्लिम स्त्रीने उत्तर दिले. बाकी सर्व स्त्रिया चिडीचूप! पण अमिताभची सून कोण? तर ऐश्वर्या हे उत्तर क्षणाचाही विलंब न लावता मिळाले. मग हा महाराष्ट्र घडविणारी ती माता-पुत्राची जोडी, जिजाई-शिवराय हे आता केवळ इतिहासा पुरतेच उरले आहेत. आता अशी माता होणे नाही. तद्वतच असा पुत्रही होणे नाही असे वाटते. कारण,शहरी स्त्रियांचे प्रश्न जे आहेत ते अर्धवट ज्ञान, बदलती जीवनशैली, पाश्चात्य संस्कृतीचे अन्धानुकरण यामुळे वेगळे आहेत व खेड्यातील स्त्री ही अजूनही धड आपली संस्कृती जोपासू शकत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण टाळूही शकत नाही आणि यामुळेच ही विषमतेची दरी वाढतेच आहे.

ह्या स्त्रियांना व ह्या समाजाला जो हिमनग पाण्याखाली आहे. त्याला हिमनगाच्या टोकावर असणा-यांनी वर काढायचे आहे. बाकी हिमनगाचा जो भाग टोकावर आहे अशांनी आपणच सगळ्यांच प्रतिनिधीत्व करतो आहोत असे दर्शवायचे आहे! पण म्हणून वस्तुस्थितीला झाकून आपण उगीचच मर्सिडीजमध्ये आहोत असा आव आणण्यापेक्षा आपण बैलगाडीत आहोत हे जाणून त्याचा टेम्पो कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

स्त्रीला समाजात मानाचे व आदराचे स्थान असावे, तिने स्वतःच्या घरात गृहसम्राज्ञी म्हणून नांदावे. ती समाजाची नियंत्रक शक्ती व्हावी, तिने मर्यादेने व शालीनतेने वागून सुपूत्र निर्माण करावेत व राष्ट्राला सुबुद्ध आणि जबाबदार नागरिक मिळवून द्यावेत आणि ह्या स्त्रियांनी जर मनावर घेतले तर पुन्हा हिदुस्थानला सुवर्ण युगाप्रत नेणारी शिवरायांसारखी नररत्ने त्या निश्चित निर्माण करतील ही देवाचीच इच्छा आपणा सर्वांच्या हातून पूर्ण होवो हीच प्रार्थना!!

- डॉ. सौ. सुवर्णा पाटील, वैद्यकीय संचालिका,

वालावलकर रुग्णालय, श्रीक्षेत्र डेरवण.